नीता मगर यांना राज्यस्तरीय मातृशक्ती पुरस्कार

नीता मगर यांना राज्यस्तरीय मातृशक्ती पुरस्कार



लातूर :येथील दिपशिखा संस्थेच्या नीता मगर यांना बेंगलुरू रोटरी क्लब व भारत विकास संगम यांच्या वतीने राज्यस्तरीय मातृशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.हा पुरस्कार पुज्य के. एन.गोविंदाचार्य व माजी खा. बस्वराज पाटिल गुलबर्गा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा सोहळा  विद्यानगर हुबळी येथे पार पडला.
पुरस्काराचे स्वरूप महावस्त्र,गौरवपत्र असा होता.तर औचित्य होते रोटरी क्लब ऑफ हुबळी व भारत विकास संगम यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर मातृ शक्ती संगम परिषदेचे.गेल्या दीड दशकापासून नीता मगर यांनी महिला सबलीकरण,ग्राम विकास व पंचायत राज बळकटीकरण कार्यक्रमात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना  राज्यस्तरीय मातृ शक्ती पुरस्कार देण्यात आला आहे.या पुरस्काराने एका सेवाभावी युवतीचा योग्य सन्मान झाल्याचा  समाजातुन आनंद व्यक्त केला जात आहे.पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक संस्था पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم