दयानंद कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा

 दयानंद कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील

 विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा





लातूर-दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी 'शिक्षकांचे समर्पण' या म्युझिकल ड्रामाद्वारे शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले. आणि एका वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या नाट्यामध्ये एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखवून त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरित करतो. विद्यार्थी एका समर्पित शिक्षकामुळे आपापल्या जीवनात यशस्वी होतात. अशा कथानकावर आधारित नाटकाच्या सादरीकरण नंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या म्युझिकल ड्रामाची संकल्पना ऋषिकेश राठोड या विद्यार्थ्यांची होती. त्याच्याबरोबर वैभवी ओहोळ,तुकाराम शिंदे,श्वेता मचकटे,मेघा बनसोडे तसेच इतर 19 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली जोशी, डॉ.भाऊसाहेब आदमाने,दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी,पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم