झटींग (अण्णा )म्हेत्रे विठ्ठल पुरस्काराने सन्मानित

झटींग (अण्णा )म्हेत्रे विठ्ठल पुरस्काराने सन्मानित 


निलंगा (प्रतिनिधी)वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र  शाखा निलगाच्यावतीने  हरीजवळगा ता. निलंगा येथे तालुका स्तरीय वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या कार्यक्रमात सा.संतदर्शनचे संपादक झटींग ( अण्णा)म्हेत्रे यांचा वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र चे राष्ट्रीय अध्यक्ष ह ,भ,प.विठ्ठल पाटील सांगलीकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष ह,भ,प.माधव महाराज शिवणीकर,लातूर जिल्हा अध्यक्ष ,ह,भ,प,श्रीधर धुमाळ महाराज शेडोळकर,निलंगा तालुका अध्यक्ष,ह ,भ,प. नामदेव महाराज सिरसले सिधी जवळगा यांच्या हस्ते विठ्ठल पुरस्कार ,व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर ( सरचिटणीस महाराष्ट्र कॉग्रेस कमिटी ) ह ,भ,प,दत्तात्रय पवार महाराज,शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाश (दादा)रेशमे ,माजी सभापती अजित माने ,माजी नगराध्यक्ष हमीद शेख सुरेंद्र धुमाळ मु.अ. महाराष्ट्र विद्यालय निटूर , प्रा दयानंद (अण्णा )चोपणे, ह भ,प, श्रीहरी चवरे,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष,बीड जिल्हा अध्यक्ष ह ,भ,प, परमेश्वर धपाटे  आदी मान्यवरांसह , वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم