लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत रक्तदान शिबीर

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत रक्तदान शिबीर 




औसा (प्रतिनिधी )-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत  माउली ब्लड सेंटर लातूर यांच्या संयुक्त विध्यमानाने  रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी  प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,हासेगाव बी फार्मसी च्या प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे) ,जनसंपर्क अधिकारी बालाजी जाधव ,वरिष्ठ तंत्रज्ञ ऐश्वर्या देशमुख ,श्रीदेवी कांबळे संदीपान ढोपरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .तब्बल ४० बॅग लातूर कॉलेज ऑफ फार्मसी मधून रक्त दान करण्यात आले .यावेळी माऊली ब्लड बँकच्या पदाधिकारी  बालाजी जाधव  यांनी एका रक्तदानामुळे  दोन जीव जगतात व रक्तदानामुळे शरीराला होणारे फायदे   हे सांगून आपले मनोगत व्यक्त केले .संचालक नंदकिशोर बावगे डॉ.लोणीकर नितीन ,महाविद्यालयातील रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी गणेश बनसोडे  लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज,लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था ,गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ,लातूर कॉलेज ऑफ सायन्स,लातूर,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातुर,या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم