सर्वांगिण विकासासाठी समर्पितभावाने कार्य करण्याची गरज- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 सर्वांगिण विकासासाठी समर्पितभावाने कार्य करण्याची गरज- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर -शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना दिल्या आहेत. योजनेचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यावरती येत आहे. केंद्र, राज्य व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना आहेत. त्याचा अभ्यास करून ग्रामीण व शहरी भागात त्या राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्पित भावनेने केल्यास गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन कव्हा ता.लातूर येथे विविध कामाचा आढावा घेत असताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी प्रा.गोविंदराव घार, प्रा.अशोक पाटील, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, सरपंच पद्मीनताई सोदले, कव्हा सोसयटीचे चेअरमन सुदाम रूकमे, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक कसबे, भास्कर होळकर, सूर्यकांत होळकर, नेताजी मस्के, दिपमाला मस्के, ग्रामपंचायत सदस्य काका घोडके, रसूल पठाण, गोपाळ सारगे, गोविंद सोदले, दिनानाथ मगर, कांताप्पा पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, कव्हा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम महाराष्ट्रामध्ये अत्यंत आकर्षक व सुविधायुक्‍त झाले आहे. विभागीय स्टेडीयमचे काम राजकीय भावनेतून बंद केले होते ते चालू करण्याचा आदेश मा.हायकोर्ट औरंगाबादने दिल. त्यामुळे ते काम चालू होत आहे. कव्हा गावच्या तीन ठिकाणी वसत्या आहेत. त्या ठिकाणी अद्ययावत पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ती राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी बोलताना कव्हेकर साहेब म्हणाले.
यावेळी प्रा.गोविंदराव घार, उपसरपंच किशोर घार, प्रा.अशोक पाटील, श्री.सुदाम रूकमे यांनी आपले विचार मांडले. यावेळी या आढावा बैठकीला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم