महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विजेत्या स्पर्धकांचा सत्कार

महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विजेत्या स्पर्धकांचा सत्कार 


लातूर -येथील महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागाद्वारे हिंदी दिवसाचे औचित्त साधून विविध स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्रचार्य डॉ.राजकुमार लखादिवे आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनोहर चपळे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये एकूण २७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला आहे.  या भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी जीवन शिंदे, द्वितीय क्रमांक विश्वजीत दगडू गरड, तर तृतीय क्रमांक ऋतुजा राजाराम भिसे यांनी मिळविला.काव्य लेखनामध्ये प्रथम क्रमांक अभिजीत ब्रम्हानंद भुजबळ, द्वितीय क्रमांक श्रद्धा भारत भोकरे आणि तृतीय क्रमांक प्रथमेश संतोष जाधव यांनी मिळविला.पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा राजाराम भिसे आणि मानसी बसवराज बनशेट्टी, द्वितीय क्रमांक उमर मकबूल शेख आणि तृतीय क्रमांक अवंतिका शंकर यादव यांना मिळाला.निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक करिष्मा फत्तु शेख, क्रमांक द्वितीय संजना किशोर गरजे आणि  तृतीय क्रमांक नेहा विठ्ठल बेले यांनी पटकावला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मनोहर भंडारे यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख अतिथी डॉ.मनोहर भंडारे म्हणाले की, जगात अनेक बोली आणि भाषा लुप्त झाल्या आहेत. लुप्त भाषेसोबत त्या भाषेतील संस्कृती, ज्ञान आणि विज्ञान हे सुद्धा लुप्त होत आहे.अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे म्हणाले की, भाषा मनुष्य जातीला मिळालेला प्रकृतीचा अनमोल वरदान आहे. त्या त्या देशातील प्रांतातील लोकांनी त्या भाषेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भाषेमुळेच आपलं अस्तित्व अबाधित असते असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोहर चपळे यांनी केले तर सूत्रसंचालन बी.ए.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऋतुजा भिसे हिने तर आभार अवंतिका यादव हिने मानले.  या कार्यक्रमासाठी विभागातील प्रा.भुरे डी.आर., डॉ.धनंजय झाल्टे, डॉ.शिंदे, कनिष्ठ विभागातील डॉ.घन:श्याम ताडेवाड, आनंद खोपे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم