आधार प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याच्या पणतीची लवकरच मशाल बनेल - शिवलिंग नागापुरे

आधार प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याच्या पणतीची लवकरच मशाल बनेल - शिवलिंग नागापुरे






औसा-लख्ख प्रकाश असणाऱ्या ठिकाणी तर अनेकजन दिवे लावण्याचे काम करतात.पण जिथे गडद अंधार आहे त्याठिकाणी प्रकाश निर्माण करणारे फार कमी असतात.आधार प्रतिष्ठान भादा यांचे सामाजिक कार्य हे समाजातील ज्या ठिकाणी अजूनही विकासाचा अंधार आहे, मागासलेपण आहे अशा ठिकाणचां अंधार दूर करण्यासाठी पेटवलेल्या पणतीप्रमाणे आहे , लवकरच या पणतीची मशाल होईल असे मत भादा कन्या प्रशालेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवलिंग नागापूरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.औसा तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठान  या सामाजिक संस्थेकडून भादा गावातील जिल्हा परिषदेच्या तीनही शाळेतली विद्यार्थ्यांना सुलेखन नोटबुक वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमात शिवलिंग नागपुरे यांनी आधार प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल हे गौरोद्गार काढले.
गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यात शेती,आरोग्य आणि शिक्षण या तीन क्षेत्रामध्ये आधार प्रतिष्ठान सेवाभावी संस्था काम करीत असून जि. प. प्रशाला भादा,कन्या शाळा येथील आणि आनंदनगर येथील 700 विद्यार्थ्याना अक्षर सुधार प्रकल्प राबिण्यासाठी  सुलेखन नोटबुक  भेट देण्यात आले. पुढें बोलताना नागपुरे म्हणाले की
मावळतीचा सूर्य सर्वांना विचारतो की माझ्या अस्तानंतर जगाला प्रकाश कोण देईल? सर्व लोक कासावीस होतील मग या पृथ्वीला अंधारातून बाहेर कोण काढेल? या प्रश्नाने सर्व गृह तारे निरूत्तर झाले. त्यावेळी एक पणती धिटाइने पुढें येवुन म्हणाली की मी पृथ्वीला अंधारातून बाहेर काढील का नाही माहीत नाही परंतु मी माझ्यजवळच्या जागेतील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करेल. आधार प्रतिष्ठानचे कार्य हे त्या पणतीप्रमाणे सुरु झाले अहे. ते आपल्या सामाजिक कार्यातून आपल्या परिसरातील व्यक्तिच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार नष्ट करून सुखाचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पणतीने पणती पेटून एक मोठी मशाल निर्माण होते. त्याच प्रमाणे आधार प्रतिष्ठानच्या ह्या सामाजिक कार्याच्या पणतीचे लवकरच सामाजिक कार्याच्या मशालीत रूपांतर होईल असे मत शिवलिंग नागापुरे यांनी व्यक्त केले.यावेळी आधार प्रतिष्ठानचे मनोज पाटील,रियाज खोज,बालाजी उबाळे,प्रशांत पाटील,पांडुरंग बनसोडे,उपसरपंच बालाजी शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील,सुरेश लटूरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इस्माईल मुलांनी, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव मुख्याध्यापक मोहन माकणे आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका,विद्यार्थी  कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم