स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजला सदिच्छा भेट

एक्सेस प्लेसमेंटचे चीफ अकाऊंटंट सतीश कुबरे यांची
स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजला सदिच्छा भेट


लातूर -जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजचा निकाल 99 टक्के लागलेला आहे. दरम्यान एक्सेल प्लेसमेंटचे चिफ अकाऊंटंट सतीश कुबेर यांनी स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजला सदिच्छा भेट दिली असून त्यांनी आयटीआयच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व ऑपरेंटीशीप विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यातून मिळणार्‍या रोजगाराच्या संधी आणि ती संधी मिळविण्यासाठी लागणारे गुण याबाबत सविस्तर टिप्सही त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.  
यावेळी जेएसपीएमचे समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार साखरे, स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजचे प्राचार्य संदिप पांचाळ, प्रा.प्रविण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जेएसपीएम स्वामी विवेकांनद पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार साखरे यांच्याहस्ते एक्सेल प्लेसमेंटचे चिफ अकाऊंटंट सतीश कुबेर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कुबरे यांनी विद्यार्थी व संबंधीत शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य मनोज गायकवाड, मुख्याध्यापक संजय बिराजदार, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी त्यांचे आभार व्यक्‍त केले.

Post a Comment

أحدث أقدم