जननायक संघटनेची 30 सप्टेबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण बैठक
लातूर-जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जननायक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक 30 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी सकाळी 10.30 वा एमआयडीसी भागातील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला जननायक संटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे,जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, आप्पासाहेब पाटील, जननायक संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मारूती सूर्यवंशी, लातूर तालुकाध्यक्ष महादेव गायकवाड, जननायक संघटना युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष उध्दवराव जाधव, राजाभाऊ मुळे, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत झाडके, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सुरेखाताई मुळे व लातूर शहराध्यक्षा शोभाताई पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
त्यामुळे या बैठकीला लातूर जिल्ह्यातील जननायक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जननायक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी केले आहे.

إرسال تعليق