शिक्षक हा प्रयत्नवादी,क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष असतो,अष्टावधानी असतो-सुनिता बोरगावकर

शिक्षक हा प्रयत्नवादी,क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष असतो,अष्टावधानी असतो-सुनिता बोरगावकर


लातूर /प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात  शाळेतील ज्ञानोपासक मंडळाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील वसमतकर तर प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता बोरगावकर तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य  संजय गुरव, उपमुख्याध्यापक  बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक संदीप देशमुख व बबन गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती. 
       यावेळी बोलताना  सुनिता बोरगावकर म्हणाल्या की,शिक्षक हा दररोज एक सामान्य शिक्षक असतो पण ५ सप्टेंबरला एक वेगळीच ऊर्जा त्याच्यामध्ये संचारलेली असते.शिक्षक हा प्रयत्नवादी,क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष असतो,अष्टावधानी असतो.विद्यार्थ्यांची प्रगती हीच शिक्षकांची खरी यशोगाथा असते. तपस्विता,तेजस्विता, तत्परता हे तीन 'त'कार शिक्षकात असतात. सकारात्मक नवनिर्मिती करून तिला सौंदर्यदृष्टी देण्याचे काम शिक्षक करतात,असे मत सुनिता बोरगावकर यांनी व्यक्त केले. 
    मुख्याध्यापक वसमतकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.केशवराज विद्यालयातील इयत्ता ८वी ते १०वी विभागातील सर्व शिक्षकांचा प्रमुख अतिथी व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुनिता बोरगावकर आणि काही विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक,
पाहुण्यांचा परिचय व स्वागत ज्ञानोपासक मंडळ प्रमुख क्षमा कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन कु.निहारिका माने व वेदिका जोशी या विद्यार्थिनींनी केले .
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख तेजस्विनी सांजेकर,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख शैलजा देशमुख, सुजयजितसिंह गायकवाड,यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم