ग्रा.रो. सेवकांना नियमबाह्य पद्धतीने कामावरून कमी करण्याच्या हालचाली

 ग्रा.रो. सेवकांना नियमबाह्य पद्धतीने कामावरून कमी करण्याच्या हालचाली हालचाली


  मजुरांचे पैसे न उचलून दिल्याने रोजगार सेवकांच्या विरोधात घेतला ठराव

औसा प्रतिनिधी-
 औसा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणारे ग्राम रोजगार सेवक हे अत्यंत कमी मानधनावर काम करीत आहेत. प्रामाणिकपणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे अद्यावत अभिलेखे ठेवणे तसेच इतर सर्व कामे ग्राम रोजगार सेवक इमाने इतबारे करीत असताना नियमबाह्य पद्धतीने राजकीय द्वेशापोटी त्यांना कामावरून कमी करण्याच्या हालचाली तालुक्यात सुरू आहेत.ग्राम रोजगार सेवकांना देण्यात येणारा प्रवास भत्ता , तसेच 15मार्च ते 31 मार्च पर्यंतचे मानधन प्रलंबित असून हा प्रवास भत्ता तात्काळ देण्यात यावा. MNMSव 1 ते 7 नमुन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, मासिक बैठका वेळेत घेण्यात याव्या व नियमबाह्य पद्धतीने होणारे रोजगार सेवक यांच्यावरील अन्याय गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालून थांबवावे या मागण्या ग्रामरोजगार सेवकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.तुंगी ता औसा येथे 
11/07/2022 रोजी सरपंच व लुंगी इतर राजकीय लोकांनी ग्रामसभा न घेता किंवा कुठल्याही सदस्य किंवा ग्रामस्थाना विश्वासात न घेता ग्रा. पं. चे सर्व नियम मोडून (ग्रामसभेचे) स्वतः त्यांच्या स्वार्थासाठी व राजकीय पुढाऱ्यांच्या गुत्तेदारांच्या स्वार्थासाठी कुणालाही न सांगता कुठलीही ग्रामसभा, दवंडी न देता मागील मासीक बैठकीच्या काही सदस्याच्या सहीवरून त्यांना न सांगता नवीन ग्रामरोजगार सेवकाची निवड त्यांनी केलेली आहे. ह्या बदल सदस्यांना माहिती होताच तुंगी येथील ग्रा.पं सदस्य अनिता चव्हाण, अंकुश नन्वरै,रुक्माबाई इंगळे यांनी गावातील 40-50 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले असून ग्रामसभा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.यावरुन बोगस ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामसेवकांवर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार हे पहाणे गरजेचे आहे.
      औसा तालुक्यातील मनरेगा मध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या कामांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्याकडून हस्तक्षेप केला जात असून ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे ग्राम रोजगार सेवकावर विनाकारण रोश आरोप करीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना नियमबाह्य पद्धतीने कमी करण्याचा हालचाली सुरू आहेत. राजकीय नेत्याच्या दबावाखाली व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचे काम करणाऱ्या गुत्तेदारांच्या दबावाखाली येऊन ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवकावर विनाकारण दोष ठेवत आहेत. शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन ग्राम रोजगार सेवकांना कमी करण्याच्या हालचाली सुरू असून सदर घटनेची चौकशी करून ग्राम रोजगार सेवकावर होणारा अन्याय तात्काळ बंद करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ तालुका शाखा औसा यांनी गटविकास अधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे दिली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष भागवत शिंदे ,सचीव गोरख कांबळे,विठ्ठल पांचाळ रवींद्र उबाळे ,दीपक सोनवणे ,सोमनाथ डोके, ज्ञानदेव शेळके ,नरसिंग कदम ,अनिल सरवदे,बालाजी उबाळे ,तात्याराव कांबळे ,माधव चव्हाण ,परमेश्वर बनसोडे, प्रदीप जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत


मी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार सेवक म्हणून 2011पासून कार्यरत असून आमच्या गावात मोठ्या प्रमाणात नरेगा योजनेमधून कामे झाली आहेत.परंतु गावामध्ये नरेगा अंतर्गत रस्ता सुरु होता. त्या रस्त्याचे काम एक बाहेरील गुत्तेदार करत आहे. विद्यमान सरपंच त्यासोबत सामिल असून सदरील कामांचे पैसे मजुरांच्या खात्यावरून उचलून द्या म्हणून औशांचा एक गुत्तेदार व सरपंच मागणी करत आहेत मी मजुरांचे पैसे उचलून न दिल्याने राजकीय आकसापोटी दुसरा रोजगार सेवक ग्रामसभा न घेता सदस्यांना विश्वासात न घेता गुत्तेदारांच्या मनांवर सरपंच यांनी ग्रामसेवकावर दबाव टाकित ठराव घेतला आहे.

सुनिल जाधव
ग्रामरोजगार सेवक

Post a Comment

أحدث أقدم