प्रभारी प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. दुष्यंत कटारे यांची निवड

 प्रभारी प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. दुष्यंत कटारे यांची निवड




बाभळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथील मराठी विषयाचे डॉ. दुष्यंत कटारे यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ.राम वाघ यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडे संस्थेने पदभार दिला.
          डॉ. कटारे यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कला महाविद्यालय, सोलापूर आणि वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथे पूर्ण केल्यानंतर यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली. प्रस्तूत महाविद्यालयात ते १९९९ पासून कार्यरत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावरील खूप मौलिक ग्रंथसंपदेचे काम त्यांनी केले आहे. त्यांचे संत चोखामेळा, कर्ममेळा आणि सोयराबाई यांच्या अभंगातील दलित जाणीव, क्रांतीगर्भाची शायरी अमर - शेख हे समीक्षात्मक ग्रंथ तर वेदनांचे रुदन हा कवितासंग्रह, जीसीबी ही कादंबरीसह राज्य, राष्ट्र, आतंरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रकाशित आहेत. साहित्यलेखन, सामाजिक चळवळीमध्ये करताना त्यांना नामवंत नऊ पुरस्कारासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना आदर्श प्राध्यापक म्हणून गौरविले आहे.
         त्यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा, युवक कल्याण व वित्तमंत्री तसेच संस्थेचे मार्गदशक श्री. दिलीपराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष आ. धीरज विलासराव देशमुख सचिव शाम माणिकराव देशमुख तसेच सर्व संचालक मंडळ, स्टाफ सचिव डॉ. जयदेवी पवार, प्रा. विवेक कदम, बाळासाहेब देशमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم