महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा



लातूर -येथील महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात १४ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य विभागाचे मुख्य समन्वयक प्रा.एस.आर.  हावळे, परीक्षक प्रा.तुळशीराम बिचकाटे, प्रा.शितल झुंजे, वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा.दीपक बजाज, प्रा.शैलेश कानडे, संगीत विभागाचे प्रा.विजयकुमार धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
हा दिवस सबंध देशभरात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो कारण संविधान सभेमध्ये हिंदी भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले आणि हिंदी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी १४ सप्टेंबर १९५३ पासून हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या निमित्ताने देशभरात सरकारी कार्यालये आणि महाविद्यालयामध्ये हिंदी सप्ताह आणि पखवाडा साजरा करण्यात येतो. यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या निमित्ताने महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २२ विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना १४ सितंबर : हिंदी दिवस, आज की युवा पिढी और भारत का भविष्य आणि आजादी के ७५ वर्ष उपलब्धिया और कमिया हे विषय देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.घन:श्याम ताडेवार यांनी केले तर आभार प्रा.कल्पना गिराम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके व बालाजी होनराव यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم