दयानंद विधी महाविद्यालयामध्ये माजी विदयार्थी संघटनेचा होतकरु विदयार्थ्याला आर्थिक मदत तसेच ग्रंथालयास पुस्तक भेटीचा कार्यक्रम संपन्न

दयानंद विधी महाविद्यालयामध्ये माजी विदयार्थी संघटनेचा होतकरु विदयार्थ्याला आर्थिक मदत तसेच ग्रंथालयास पुस्तक भेटीचा कार्यक्रम संपन्न


लातूर -दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत दयानंद विधी महाविद्यालयाच्या माजी विदयार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता दयानंद विधी महाविदयालयामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूनम नाथानी, तर समन्वयक प्रा.डॉ.एन.डी.जाधव हे उपस्थित होते.  
दयानंद विधी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमामध्ये दयानंद विधी महाविद्यालयातील विधी पदवी अंतिम वर्गातील विदयार्थी अशोक कलिंगरे याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच्या परिवारास आर्थिक मदत म्हणून त्याचा भाऊ अनिल कलिंगरे याला विधी महाविद्यालयातील आजी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे रु.31,500/- रुपयांचा धनादेश मदत म्हणून सुपूर्द करण्यात आला. याचबरोबर या कार्यक्रमामध्ये संघटनेतर्फे दयानंद विधी महाविद्यालयातील ग्रंथालयास रु.64,964/- रुपयांची कायदेविषयक ग्रंथसंपदा भेट म्हणून देण्यात आली. सदर ग्रंथ संपदा विधी महाविद्यालयातील अध्ययनशील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, ही या ग्रंथभेटीची पार्श्वभूमी होती.
माजी विद्यार्थी संघटनेच्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये संघटनेच्या अध्यक्षा ॲड. तेजस्वी जाधव, उपाध्यक्ष ॲड. नरेश कुलकर्णी, सचिव ॲड. निलेश मुचाटे, सहसचिव ॲड. राजेंद्र लातूरकर, कोकणे सुरज, तुकाराम सूर्यवंशी, समन्वयक प्रा.डॉ. एन.डी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्यापक स्वरुपात आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूनम नाथानी, ग्रंथपाल डॉ. संगीता महाजन, डॉ. व्ही.व्ही. चिंते, शिक्षकेतर कर्मचारी मनोज बाजपाई हे उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. नरेश कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

أحدث أقدم