विश्व नाण्यांचे


 


विश्व नाण्यांचे


: मिरजेचे गणपती पंतप्रधान नाणे





 आपला भारत देश अनके धर्म,जाति पंथांनी नटलेला असून इथे विविधतेत एकता आहे. त्यातच आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो. महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव सण, महाराष्ट्रातील घराघरात गणेश उत्सव साजरा केला जातो. यात अनेक मंडळे सार्वजनिक गणेश उत्सव सण साजरा करतात. यातून समाज प्रबोधना सोबत विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील लोकांच्या प्रिय बाप्पाचे नुकतेच आगमन झाले आहे. गणेश हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवांपैकी एक देव आहे. ज्ञान आणि बुद्धिसाठी हत्तीच्या डोक्याच्या या सौंदर्यवान गणेशदेवाला ओळखले जाते.          दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर मिरज.या शहरात इ.स. १७६१ पासून पेशव्यांच्या पटवर्धन सरदारांचा अमल संस्थानांचे भारतात विलीनीकरण  होईपर्यंत सुरू होता. १७६१ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी  गोविंद हरी  पटवर्धनांना मिरजेचे ठाणे व आसपासचा पंचवीस लाखांचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. इ.स १७९९ मध्ये पटवर्धन घराण्यातील कलह दुसऱ्या बाजीराव पेशवे पर्यंत पोहचला. त्या वेळी पेशव्यांकडून मिरज प्रांताची विभागणी करून गंगाधररावांना मिरज व चिंतामणरावांना सांगली देण्यात आली. १८०८ साली गंगाधररावांनी पेशव्यांना नजराणा देवून चिंतामणरावांच्या अधिपत्यापासून सुटका करून घेतली, त्याच वर्षी गणपती - पंतप्रधान हा रुपया चांदी धातूत पाडण्यात आला.
पेशवेकाळात मराठेशाही चलनात तांब्याचे पैसे छत्रपतींच्या नावाने तर रुपया व मोहरा मोगल बादशहाच्या नावे पाडल्या जात असत. गणपती पंतप्रधान रुपया हे नाणे चांदीचा रुपया असल्याने नामधारी मोगाल बादशाह शाह आलम याचे नावाने पाडण्यात आले आहे.या नाण्याचे वैशिष्ट्य यावर
नागरी व फार्सी या दोन्ही लिपीत मजकूर छापला आहे. समोर देवनागरीत "श्रीगणपती" व फार्सीत "शाहआलम बहादुर बादशहा गाझी सतह १२२' असे तर मागील बाजूस देवनागरीत "श्रीपंतप्रधान" व फार्सी लिपीत 'मैमनन माणूस सतह 246 जुलूस सबै मूर्तसावाद' असा मजकूर आहे. 
मिरजेच्या नेहमीच्या चलनापेक्षा हे नाणे वेगळे आहे. नेहमीच्या चलनी रुपयावर 'म' हे अक्षर असायच व कधी नसायच ही. या नाण्यावर पेशवे आणि पटवर्धन यांच्या आराध्य देवतेचे (गणपतीचे) व पटवर्धनाच्या अधिपतीचे (पेशव्यांचे नाव देवनागरीत कोरले आहे. मराठेशाही नाण्यांवर कोणत्याही प्रकार परोल्यांचे नाव दे असण्याची दोन उदाहरणे आहेत. एक सोन्याचा फनम आणि दूसरे म्हणजे गणपती-पंतप्रधान नाणे. अन्यथा छत्रपतीच्या सरदारांची नावे नाण्यांवर सहसा कधी आढळत नाहीत तसेच कोणत्याही देवतेचे नावही मराठ्यांच्या नाण्यावर पूर्णाक्षरात लिहिल्याचे तंजावरकरांच्या खेरीज हे एकमेव उदाहरण आहे. पटवर्धनांची राजकीय निष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा या दोहोंचे या गाण्यात प्रतिबिंबच पडल्याचे दिसून येते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अनेक दुर्मिल नाणी व त्यांचा इतिहास, अभ्यास पाहण्यासाठी गुगल, पुस्तकें, इतिहासकार, नाणी अभ्यासक, तज्ञ, विविध माध्यमाच्या आधारे लिखाण करण्यात येत असतं , आपल्या
भारताचा महान इतिहास आणि त्या त्या काळातील याची माहितीसाठी - श्रीचक्रधर म्युझियम निलंगा-संग्राहक बेवनाळे सौदागर सर - नाणी संग्राहक अभ्यासक .सोबत हे १९४२ चे दिवाण मिरज कोर्ट फी स्टँप माझे संग्रहातून आहे. नाणे गुगल सौजन्य


Post a Comment

أحدث أقدم