गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांच्या माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी घेतल्या भेटी

 


गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांच्या माजी मंत्री, आमदार अमित  देशमुख यांनी घेतल्या भेटी






 

लातूर प्रतिनिधी : 

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था संघटना पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.

लातूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ मार्केट यार्ड लातूर, किसान स्टॉप जिल्हा बँक गणेश मंडळ लातूर, परिमल गणेश मंडळ लातूर, विघ्नहर्ता गणेश मंडळ बाभळगाव, लातूरचा महाराजा गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर, खाडगाव रोडचा राजा गणपती मंडळ, लातूर आदी गणेश मंडळांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची भेट घेतली.  

यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, अशोक गोविंदपुरकर, माजी उपसभापती मनोज पाटील, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, मारुती महाराज सहकारी साखर कारखानाचे चेअरमन गणपती बाजूळगे, व्हाईस चेअरमन श्याम भोसले,औसा बाजार समिती चे मुख्य प्रशासक राजेन्द भोसले, सचिन दाताळ सुधीर गोजमगुंडे, बालाप्रसाद बीदादा, रमेश सूर्यवंशी, सुधीर बोरुले, गुलाब मोहिते, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, संचालक पृथ्वीराज शिरसाट, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, राजकुमार पाटील, जयेश माने, अनुप शेळके, हंसराज उगिले, सचिन दाताळ, युवराज जाधव, आसिफ बागवान, पप्पू देशमुख, किरण बनसोडे, किरण जाधव, बाबू शेख, सहदेव मस्के, ज्ञानोबा मस्के, ज्ञानदेव पाटील, नवनाथ पाटील, तुकाराम शिंदे, उद्धव पाटील, फारुक शेख, मेनोदीन शेख, बाबळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, विकास कांबळे, दगडू आप्पा मिटकरी, रामराजे जाधव, महादेव शेळके, सुंदर पाटील कव्हेकर, गणेश देशमुख, साईराज पवार, विजयकुमार धुमाळ, अभिजीत पाटील, निरज पाटील  आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم