'स्री' ला माणूस म्हणून जगण्याचाअधिकार असला पाहिजे- साहित्यिक प्रा.नयन राजमाने

'स्री' ला माणूस म्हणून जगण्याचा

अधिकार असला पाहिजे

- साहित्यिक प्रा.नयन राजमाने





 लातूर -मिळून साऱ्याजणी मासीकाच्या लातूर येथील प्रतिनिधी उषा भोसले यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि समतेचा भाग या संकल्पनेअंतर्गत मिळून साऱ्याजाणीच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि समतेच भान' या कार्यक्रमाच्या अध्यक्ष रागिनी यादव तर उपस्थिती प्रा. नयन भादुले-राजमाने' साहित्यनयन', मनीषा काळदाते शिवाई प्रतिष्ठन, आयोजक उषा भोसले यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रा. नयन राजमाने यांनी, स्री व्यक्तिमत्त्व विकासाअंतर्गत शिक्षण, आरोग्य, वैचारिक जडणघडण, स्त्री स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसटशा रेषेला अधोरेखित केले. तिच्या चौफेर विकासावर भाष्य केले. तिच्या माणूस म्हणून घडण्याच्या प्रक्रियेला स्पष्ट केले. स्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असला पाहिजे असे मत मांडले. तर मनीषा काळदाते यांनी मार्गदर्शन केले. नगरसेविका रागिणी यादव यांनी महिलांच्या समस्यांवरती प्रकाश टाकला व स्व  विकासावर भाष्य करत  अध्यक्षीय समारोप केला.

याप्रसंगी पुस्तक प्रकाशन निमित्ताने विमल मुदाळे यांचा सन्मान करण्यात आला. विजया भणगे, विमल मुदाळे, शीला कुलकर्णी, नीलिमा देशमुख, सविता कुलकर्णी, इ. कवयित्रींनी विविध विषयांवर कवितांची बरसात केली. आभार मीरा कोराळे यांनी व्यक्त केले.

मिळून सार्‍याजणीच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्तच्या ३३ कार्यक्रमांपैकीचा ९ वा कार्यक्रम लातूर येथे संपन्न झाला.

--------

Post a Comment

أحدث أقدم