जागतिक फ़िजिओथेरेपी दिन‌ लातूरच्या फिजिओथेरपीत साजरा

 जागतिक फ़िजिओथेरेपी दिन‌ लातूरच्या फिजिओथेरपीत साजरा



औसा-दि.८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात  जागतिक फ़िजिओथेरेपी दिन म्हणून साजरा केला जातो लातूर मधील औसा तालुक्यातील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फ़िजिओथेरेपी महाविद्यालयाने हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील लोकांना फ़िजिओथेरेपी चे महत्व तसेच फ़िजिओथेरेपी च्या उपचाराने कोणते इलाज केले जातात हे समजून सांगण्यासाठी लातूर मधील महात्मा बसवेश्वर चौक, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक तसेच नंदी स्टॉप येथील श्री नंदी गणेश मंडळ समोर “फ़िजिओथेरेपीचे महत्व” हे लघु नाट्य सादर केले लघु नाट्यासाठी शहरातील लोकांचे अत्यंत चांगले प्रतिसाद आले. फ़िजिओथेरेपी म्हणजे काय ? हे लोकांना माहिती व्हावी हे या लघुनाट्यचा मुळ हेतू होता, महाविद्यालयाद्वारे लातूर येथील कातपूर रोड या ठिकाणी महाविद्यालयाद्वारे मोफत ओ.पी.डी राबविली जात असून या ठिकाणी पाठीचे दुखणे, हात अवघड होने, अर्धांग वायू, गुडघे दुखी, रक्तदाब, कंबर दुखी, मानदुखी, हृदयविकार, मेंदूचा झटका, पार्किन्सन या सारख्या अजरांवर मोफत उपचार केले जातात, या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल व “जागतिक फ़िजिओथेरेपी दिन” निम्मित  वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव  वेताळेश्वर बावगे, कोष्याध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक आत्माराम मुलगे, संचालक  नंदकिशोर बावगे, संचालक सौ माधुरी बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर चे प्राचार्य  श्रीनिवास बुम्रेला,लातूर कॉलेज ऑफ आय टी आय चे प्राचार्या सौ.योगिता मेतगे, राजीव गांधी इनस्टिट्युट ऑफ पोलीटेकनिक चे प्राचार्य श्री संतोष मेतगे, लातूर कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य
 राजशेखर चौधरी, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक 
गोरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

أحدث أقدم