पंचकोनाच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास - महेश कस्तुरे

पंचकोनाच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
               - महेश कस्तुरे




 लातूर /प्रतिनिधी:विद्यार्थी, शिक्षक,पालक, संस्था व समाज यांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्याचा खरा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत 'भाशिप्र' संस्थेचे विद्यासभा संयोजक आणि अंबाजोगाई येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश कस्तुरे यांनी व्यक्त केले.
    लातूर येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी नेतृत्वगुण विकास शिबिराच्या समारोपीय सत्रात
प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरे बोलत होते.मंचावर भाशिप्र
संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर, रेनिसन्स सीबीएससी स्कूलच्या प्राचार्या आलिशा अग्रवाल, केशवराज माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक दिलीप चव्हाण, संदीप देशमुख,बबन गायकवाड,
अंजली निर्मळे,अभाविपचे ज्ञानेश्वर उद्देवाल,श्रीमती निकिता जाधव,सूरज साबळे,शिबीर निरीक्षक बालाजी पडलवार, शैलजा देशमुख यांची उपस्थिती होती.
     पुढे बोलताना महेश कस्तुरे म्हणाले की,अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची प्रगती साधून घेण्यासाठी नेतृत्वगुण विकास शिबिराचे 'भाशिप्र'  संस्थेच्या विद्यासभेने आयोजन केलेले आहे.विद्यार्थ्यांना घडवत असताना संस्था,शिक्षक, विद्यार्थी,पालक व समाज या पंचकोनातून विद्यार्थ्यांच्या पंचकोष विकसनाचे कार्य केले जाते.यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि नेतृत्व विकसित होते.हे काम विद्यासभेतील अभ्यास पूरक मंडळाच्या विविध मंडळांच्या माध्यमातून प्रभावीपणे होते,असे मत कस्तुरे यांनी यावेळी व्यक्त केले.
     रेनिसन्स सीबीएससी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अलिशा अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.शिबीर निरीक्षक बालाजी पडलवार यांनी शिबीर आयोजनासंदर्भात समाधान व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्ञानेश्वर उद्देवाल व सुरज साबळे,निकिता जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     दिवसभर चाललेल्या या शिबिरातील समारोपीय सत्राचे प्रास्ताविक अभ्यास पूरक मंडळ प्रमुख करूणा गायकवाड यांनी केले.सूत्रसंचलन शैलेश सुपलकर तर दशरथ कदम यांनी सर्वांचे आभार मानले.कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख आदिनाथ कदम,सहप्रमुख दशरथ कदम, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم