गणेशोत्सवानिमित्त श्री केशवराज शैक्षणिक संकुलात अथर्वशीर्ष पठण


गणेशोत्सवानिमित्त श्री केशवराज शैक्षणिक संकुलात अथर्वशीर्ष पठण


   लातूर/प्रतिनिधी: गणेशोत्सवानिमित्त येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने रेनिसन्स इंटरनॅशनल  सीबीएसई स्कूल येथे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपन्न झाला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून भाशिप्र संस्था उपाध्यक्ष जितेश चापसी तर प्रमुख वक्ते म्हणून श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर हे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये विद्याभारती देवगिरी प्रांत उपाध्यक्ष तथा भाशिप्र संस्था पूर्व कार्यवाह
नितीन शेटे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,संस्था सभासद नरेंद्र पाठक,रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल शालेय समिती अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर जोशी यांचा समावेश होता.
         यावेळी अथर्व शीर्षाचे महत्त्व सांगताना प्रमुख वक्ते सुनील वसमतकर म्हणाले, की अथर्वशीर्ष पठणाने आचारशुद्धी,विचारशुद्धी व उच्चारशुद्धी होते.गणपती ही बुद्धीची देवता आहे.गणेशाच्या आराधनेने अनंत सुखांची प्राप्ती होऊन माणसाला समाधानही प्राप्त होते.दररोज एकदा तरी गणपती अथर्वशीर्ष पाठ नित्यनियमाने करावा असे मत वसमतकर यांनी व्यक्त केले.
      यावेळी संगीत विभागातील संतोष बीडकर,नरेश इरलापले कांचन तोडकर, जान्हवी देशमुख, कमलाक्षी कुलकर्णी यांनी अथर्वशीर्षाचे पठण लयबद्धतेत सादर करण्यात आले.श्री गणेशाची आरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले.
      यावेळी श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे,रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या सौ.अलिशा
अग्रवाल,केशवराज कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सौ.मनिषा टोपरे,आस्था संकुल प्रमुख उमेश गाडे,जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षक पालक संघ सदस्य,माजी विद्यार्थी संघ सदस्य,संकुलातील विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. 
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक संदीप देशमुख,पर्यवेक्षक बबन गायकवाड,अंजली निर्मळे, प्रल्हाद माले यांचे सहकार्य लाभले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती शैला कुलकर्णी यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم