मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त घेण्यात येना-या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नियोजन बैठक संपन्न
लातूर-राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीयक्षिणता नियंत्रण कार्यक्रम लातूर शहर महानगरपालिका,(आरोग्य विभाग) लातूर मार्फत मराठवाडा मुक्ती् संग्राम दिन दिनांक 17 सप्टें बर 2022 निमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नियोजन बैठक आज दि.08/09/2022 रोजी संपन्न झाली. सदर बैठकीस आयुक्त तसेच जिल्हा रुग्णालय लातूर येथील नेत्ररोग तज्ञ यांनी मनपा लातूर शहरातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी,पीएचएन,एस.एना. तसेच आरोग्य कर्मचारी स्त्री व पुरुष यांना शिबीराअंतर्गत सर्व मोतीबिंदू आजाराचे निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन केले. मनपाचे 08 प्रानाआकेंद्राच्या ठिकाणी दिनांक 14/09/2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून शिबीर घेण्यात येणार यात शस्त्ररक्रियेसाठी लागणा-या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.या शिबीरामध्ये मोतीबिंदू व दृष्टी क्षिणता असणा-या रुग्णावर दिनांक 17/09/2022 ते 17/10/2022 या कालावधीत विविध शासकिय संस्थे मध्येत त्यांच्या वर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
तरी सर्व जनतेने या मोहिमेचा लाभ घ्यांवा असे आवाहन आरोग्यं विभाग लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
إرسال تعليق