प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रातच देण्याचे आवाहन


प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रातच देण्याचे आवाहन

 

    लातूर/प्रतिनिधी:प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपापल्या घरी स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन जलाशयात न करता मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रांकडे त्या मुर्ती द्याव्यात. सार्वजनिक गणेश मंडळांनी १२ नंबर पाटी येथील खदानीत विसर्जन करावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

      दहा दिवसांपूर्वी स्थापित केलेल्या श्रीगणेशाचे शुक्रवारी (दि.९सप्टेंबर )विसर्जन होणार आहे.शहरातील नागरिक आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देणार आहेत.प्रथेप्रमाणे श्रीगणेशाच्या मुर्तीचे जलाशयात विसर्जन केले जाते.पण जलप्रदूषण रोकण्यासाठी मनपाच्या वतीने जलाशयात विसर्जन न करता नागरिकांनी आपल्या मुर्ती संकलन केंद्रात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    यासाठी  मनपाकडून शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.या ठिकाणी मनपाचे कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून मुर्तींचे संकलन करणार आहेत.

        नांदेड रस्त्यावरील यशवंत शाळा,विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी,मंठाळे नगर येथे मनपा शाळा क्रमांक ९,सिद्धेश्वर मंदीर,जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय विहीर,बार्शी रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची टाकी,

दयानंद महाविद्यालयातील पार्किंग परिसर,सरस्वती महाविद्यालय परिसरातील पाण्याची टाकी,टाऊन हॉल मैदान,बांधकाम भवन,कव्हा रस्त्यावरील खंदाडे नगर,साळे गल्ली येथील यशवंत शाळा आणि तिवारी विहीर येथे मुर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.शहरातील नागरिकांनी या ठिकाणी आपल्या घरातील गणेशमुर्ती कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात,असे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

    सार्वजनिक मंडळांकडून स्थापन करण्यात आलेल्या मोठ्या मुर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी मंडळांनी आपल्याकडील मुर्ती स्वतःच्या वाहनाने १२ नंबर पाटी येथील खदानीपर्यंत घेवून याव्यात,असे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

     शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुचनांचे पालन करावे.नागरिकांनी आपल्या मुर्ती संकलन केंद्रांवर द्याव्यात. मंडळांनी १२ नंबर पाटी येथील खदानीत मुर्ती विसर्जन करावे.प्रदुषण रोकण्यासाठी मनपाला सहकार्य करावे,असे आवाहन मनपाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم