पारंपारिक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी तिर्थक्षेत्र दर्शन यात्रेचे आयोजन

 पारंपारिक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी तिर्थक्षेत्र दर्शन यात्रेचे आयोजन






 लातूर ः भारतीय संस्कृतीचे रक्षक आणि देवदेवतांचे उपासक गोंधळी पारंपारीक लोककलावंत चळवळ गतीमान करून प्रलंबीत न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी तुळजापुर येथून दि.27 सप्टेंबर ते 2 आक्टोबर या कालावधीत तिर्थक्षेत्र दर्शन यात्रा अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे प्रवास करणार आहेत अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड गोंधळी आणि प्रदेश सरचिटणीस दिलीपराव पाचंगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
दि.27 रोजी दु.1 वाजता तुळजापूर येथील तुळजाभवानीदेवी मंदिरातील गोंधळ विधीवत पुजा स्थळावर संबळ वादन करुन आणि मंदिरात दंडवत घालून तिर्थक्षेत्र दर्शन यात्रेस राजेंद्र वनारसे प्रारंभ करतील. ते तेथून निघून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ समाधी मंदिरात सांयकाळी 04 वाजता जाऊन दंडवत घालतील. त्याप्रसंगी राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहीर-भजनी परिषदेचे अक्कलकोट तालूकाध्यक्ष नागनाथ परळकर आणि संघटनेचे सोलापुर शहर जिल्हाध्यक्ष रुपेश भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
दि.28 रोजी सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर संत नामदेव पायरीजवळ दंडवत घालून दर्शन यात्रा बैठकीच्या स्थळी रवाना होईल. आणि सायंकाळी सांगली येथे 5.00 वाजता व जयसिंगपूर जि.कोल्हापूर येथे सायंकाळी 7.00 वा.ही यात्रा पोहचणार असुन श्री जगदंबा देवी मंदिरात आरती समारंभाप्रसंगी दंडवत घालण्यात येणार आहे अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. या दर्शन यात्रेचा प्रवास कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
राजेंद्र वनारसे यांचा तिर्थक्षेत्र दर्शन यात्रा प्रवास: दि.27 सप्टें- दुपारी 01:00वा. तुळजापूर सायं.05:00वा.अक्कलकोट 28सप्टें.- सकाळी 11: 00पंढरपुर सांय.05:00 वा.सांगली रात्री 08:00 वा.जयसिंगपूर * 29सप्टें : दुपारी 01:00 वा. कोल्हापूर, सांय.06:00 हुपरी 30 सप्टें.: दुपारी 01:00 पुणे सांय :-06:00 शिर्डी 01आक्टो: सकाळी 11:00 नाशिक दुपारी 02:00 सप्तशृंगीगड रात्री 08:00 नंतर शेगांव 02 आक्टो.: दुपारी 02:00 वा.चंद्रपुर रात्री 09:00 माहुरगड 03आक्टों.ः सकाळी 11:00 नांदेड सांय. 05:00 परळी सांय.07:00 अंबाजोगाई रात्री 10:00 येरमाळा येथे येडेश्‍वरी मंदिरात या तिर्थक्षेत्र दर्शन यात्रेचा समारोप दंडवत घेवून करण्यात येईल असेही पत्रकात नमुद केले आहे.
ही यात्रा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बाबासाहेब कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नंदाताई शेरे, दिलीपराव पाचंगे, सुरेश ढवळे, शाहीर सुभाष गोरे, संभाजीराव खाडे, दिवाकर बावणे, नागेश नवरखेले,किशोर डांगे, ज्ञानेश्‍वर जाधव, चंद्रकांत जाधव, सौ.मंगल कुर्‍हाळ, श्रीकृष्ण बोटुळे, शिवनारायण रेणूके, अविनाश नवरखेले, उल्हासराव काटेउमरीकर, गणपत पाचंगे, चंद्रकांत मोरे, रूपेश भोसले, ज्ञानेश्‍वर मोरे, सचिन भिसे आदि पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

أحدث أقدم