इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेची सर्व साधारण सभा संपन्न

 इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेची सर्व साधारण सभा संपन्न




लातूर / प्रतिनिधी- इंदिरा महिला नागरी सहकारी बँक लि. लातूर ची २६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा बँकेचे मुख्य कार्यालय, लातूर येथे अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात बँकेचे विद्यमान अध्यक्षा ऍड. सौ. सविता ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रथमतः श्रीमती अलका सारडा व सौ. श्रुती जैन यांचे स्वागत बँकेच्या अध्यक्षा ऍड.सी. सविता मोतीपवळे व उपाध्यक्षा सौ. विजया सावळे यांनी केले. याप्रसंगी माजी अध्यक्षा सौ. अरुण देशमुख (सौ. सुमती गुणगुणे), सी. नागिणी मोतीपवळे, सौ. शांताबाई पाटील, श्रीमती विभावरी कस्तुरे, श्रीमती सुमन गंभीर, श्रीमती पद्मा झंवर स्वागत बँकेचे अधिकारी श्री. राजकुमार बेडके शुभांगी वाजे यांनी केले.

सभेची सुरुवात बँकेचे अध्यक्षा ऍड. सौ. सविता ओमप्रकाश मोतीपवळे यांनी वार्षिक अहवाल वाचनाने केली. सभेसमोरील विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. करकोळे ए. एस. यांनी केले.
तसेच या सभेत बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा आणि समाजात नावलौकिक मिळविलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा हि सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने डॉ. सुलभा ओमप्रकाश साकोळकर, डॉ. सौ. अंजली वैभव पाटील, चि. हर्ष चेतन सारडा, कु. प्राची सुरेशचंद्र सलगरे, श्री. लक्ष्मीकांत सोनी, डॉ. श्रीमती सुचित्रा सुधीर भालचंद्र, ऍड. स्वाती गणपतराव तोडकरी, ऍड. सौ. महानंदा सोनटक्के (निटुरे), कु. रुद्राणी कमलेश पाटणकर, श्री. मन्मथअप्पा काशिनाथअप्पा पंचाक्षरी, डॉ. श्री. पवन सत्यनारायण लड्डा, ऍड. श्री. अजय कलशेट्टी, डॉ. श्री. संगमेश्वर रवी चवंडा, डॉ. सौ. आरती ब्रिजमोहन झंवर, ऍड. सौ. राजांनी गिरवलकर, सौ. रश्मी कपिल खानापुरे, ऍड. सौ. कल्पना भुरे (सुलगूडले), इत्यादी मान्यवरांचा सत्कार सभेला उपस्तित असलेल्या प्रमुख पाहुणे सौ. श्रुती जैन व बँकेच्या जेष्ठ संचालिका श्रीमती अलका सारडा यांच्या हस्ते करण्यात आला.
या सभेत आदरणीय ऍड. बी. व्ही. मोतीपवले सर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृषी सभापती श्री. अण्णासाहेब पाटील, डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे तसेच बँकेचे सन्माननीय सभासद व कर्मचारी वर्ग उपस्तित होता.
डॉ. ब्रिजमोहन झंवर, सत्यनारायण लड्डा, डॉ. विवेक जाधव, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, गुलाब पाटील, ऍड. सलगरे, श्रीमती पद्मा झंवर, श्री. रामढवे, राजाभाऊ गिरवलकर, सौ. भ्याग्यश्री पाटील, सौ. शिंदे, परळी नगर पंचायतच्या विरोधी पक्ष नेत्या श्रीमती उमादेवी समशेट्टे, कमलेश व मंगेश पाटणकर प्रा. सौ अश्विनी पाटील इत्यादी मान्यवर उपस्तित होते. सौ. दीपिका विजय संकाये यांनी सूत्र संचालन केले व आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم