जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टर मधील मोहरा येथे बिआरओच्या जवानांनी केली गणरायाची प्राणप्रतिष्ठा!

 जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टर मधील मोहरा येथे बिआरओच्या जवानांनी केली गणरायाची प्राणप्रतिष्ठा

मोहरा/प्रतिनिधी-जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर नजीक मोहरा येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या  53 आरसीसी बिकन येथे 31 ऑगस्ट रोजी सकाळी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.गणेश मुर्तीची स्थापना आज सकाळी भारतीय लष्करातील कमान अधिकारी लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. कमान अधिकारी लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंह यांनी 53 आरसीसी यांच्या वतीने सम्पूर्ण गणेशभक्तांना श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आणि श्री गणरायाच्या कृपेने सर्वांचे आरोग्य चांगले राहण्याची कामना केली.दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही येथे नवीन देखावा साकारण्यात आला.यावर्षी अमरनाथ गुफेचा  देखावा साकारून बाबा बर्फाणीच्या दर्शनासोबत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. सदर   देखावा हा सर्व मराठी जवानांनी आपली ड्यूटी करून आराम करायच्या वेळे मध्ये बनवलाय. 53 आरसीसीचे मुख्य काम manje  बॉर्डर वर रोड बनविणे आणि त्याची देखभाल करने हे आहे.उरी सेक्टर  मधील बिआरओच्या जवानांनी आपले देशसेवेचे कर्तव्य पार पाडत श्री गणरायाची स्थापना करून भारतीय संस्कृती परंपरा जतन केली आहे. या उत्साहात फ़क्त मराठी नहीं तर  भारतातील सर्व  राज्याचे लोकांचे फार योगदान आहे.विशेष म्हणजे या गणेशोत्सव सोहळ्याच्या आयोजनात लष्करी जवानांत लातूर जिल्ह्यातील पाच जवानांचा समावेश आहे.श्री गणरायाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला विकास जाधव, प्रशांत काळे, संदीप वावगे, शिवानंद म्हेत्रे उमेश जवंजाळ, शंकर सहारे, राहुल सोनवणे, संदीप गारे, गौतम पवार, रमेश हिंदोळे, संदीप वानखेडे, संतोष तांबेकर, वसंत शेळकांडे, सचिन शेंदरकर, दयानंद मुंडे , दिलबाग ,गणेश राव , गौतम,संदीप
पाटील,नारायण पाटील,गणेश कोल्हे,अंबादास कांबळे, धाडस अनिल,
विकास गावले
,कुरणे अनिल लष्करी जवान, कर्मचारी, अधिकाऱ्यांची उपस्थिति होती.

Post a Comment

أحدث أقدم