माझा एक दिवस माझ्या, बळीराजासाठी
लातूर कृषी विभागाचे अधिकारी निघाले शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामाला ; सहसंचालक हरंगुळ तर कृषी अधिक्षक तादलापूर मुक्कामी
लातूर-माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या योजना त्याची अंमलबजावणी ह्या संदर्भात त्यांच्या सोबत राहून जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा एक उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. कृषी मंत्र्यापासून सचिवा पर्यंत सगळे वेगवेगळ्या गावी आज मुक्कामी निघाले आहेत. लातूर विभागाचे कृषीचे सहसंचालक साहेबराव दिवेकर लातूर तालुक्यातील हरंगुळला तर कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने उदगीर तालुक्यातील तादलापूर येथे मुक्कामी तर आत्माचे प्रकल्प उपसंचालक तथा कृषी विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी आर.एस.पाटील निलंगा तालुक्यातील उस्तुरी या गावामध्ये मुक्कामासाठी जात आहेत.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात
कृषिमंत्री, कृषी सचिव,कृषी आयुक्त, सर्व कृषी संचालक, विभागीय कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक हे निवडलेल्या गावांमध्ये मुक्काम करून संपूर्ण दिवस
शेतकऱ्यांसोबत थांबून शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या अडचणी जाणून घेणे... शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासंदर्भात काय करता येईल. ज्या गावी मुक्कामी थांबलो आहे. त्या गावांमध्ये विभागाच्या कोणत्या योजना राबवलेल्या आहेत. योजना राबवताना काय अडचण येतात. यासंदर्भात माहिती घेण्याचे काम करण्यात येणार आहे. आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी गावामध्ये मुक्काम करून शेतकऱ्यांशी हितगुज करणार आहेत.
याकार्यक्रमास शेतकरी बंधूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले आहे.
हा उपक्रम चालणार तीन महिने
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे तीन महिने कृषी विभागाचे अधिकारी महिन्यातून तीन वेळा, तर जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणा आणि कृषी संलग्न विभाग महिन्यात एक वेळा गावांना भेटी देणार असून शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल एकत्र करून शासनाकडे पाठवला जाणार असून त्यातून राज्यस्तरावर यावर योग्य तो अभ्यास करून पुढचे धोरण निश्चित करण्यासंदर्भात उपयोग होणार असल्याची माहिती कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिली.
إرسال تعليق