शहीद जवान विवेकानंद भोसले यांच्या कुटुंबियांचा सन्मान

शहीद जवान विवेकानंद भोसले यांच्या कुटुंबियांचा सन्मान

 
५३ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने शहीद जवान विवेकानंद भोसले यांच्या कुटुंबियांचा सन्मान



 
लातूर-:शहीदो को शत शत नमन या केंद्र सरकारच्या उपक्रमा अंतर्गत निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील १९९७ मध्ये शहीद जवान सेनामेडल शिपाई विवेकानंद भोसले यांच्या कुटुंबीयांचा लातूर  येथे भारत सरकारच्या कार्यक्रमांतर्गत ५३महाराष्ट्र बटालियन लातूर येथून सुभेदार दिलीप दामोर ,हवालदार हरी गायकर, दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील एनसीसी अधिकारी लेफ्टनंट विवेक झंपले व दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे एन.सी. सी. केअरटेकर डॉ.साईनाथ उमाटे यांच्या उपस्थितीमध्ये शहीद माता शकुंतला भोसले व भोसले कुटुंबीयांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 






प्रथमतः  शहीद जवान सेना मेडल शिपाई विवेकानंद भोसले  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शहीदो को शतश नमन म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले सन्मान चिन्ह देण्यात आले.याप्रंसगी शहिदांचे भाऊ प्रा. हंसराज भोसले, रुपेश भोसले , दयानंद कला वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी लातूर विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.५३ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार व दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Post a Comment

أحدث أقدم