अग्रीमची २५ टक्के मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी - खा.राजेनिंबाळकर


 

अग्रीमची २५ टक्के मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी - खा.राजेनिंबाळकर

          धाराशिव-लोकसभा मतदारसंघातील धाराशिव जिल्ह्यासह बार्शी, औसा व निलंगा तालुक्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid-Season Adversity) उदा. सततचा पाऊस, शंखी गोगलगाय, यलो मोझॅक, चक्री भुंगा, खोड माशी या किडींचा व विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्के पेक्षा जास्त उत्पादन घटणार आहे.

          महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या दि. १ जुलै, २०२२ रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रपिवियो-२०२२/प्र.क्र.७२/११-ए नुसार मुद्दा क्र.१०.२ हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमूळे (Mid-Season Adversity) जर पीकाच्या अपेक्षित उत्पादनात ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी उत्पादनात घट येत असेल तर मा. जिल्हाधिकारी यांनी अधिसुचना काढून राज्यशासनाचे अधिकारी व विमा कंपनी यांच्या संयुक्त पाहणी नुसार भरपाई निश्चित करता येते व शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत रक्कम पात्र शेतकऱ्यांना देण्याची तरतुद आहे.

          त्यानुसार धाराशिव लोकसभा मतदारसंघातील संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अधिसुचना काढून संयुक्त पाहणी करून नुकसान ग्रस्त शेती पिकाचे संयुक्त पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत महसूल, कृषी व विमा कंपनीचे अधिकारी यांना आदेश निर्गमीत करून पात्र शेतकऱ्यांना सोयाबन व इतर पिकाची विमा कंपनीमार्फत २५ टक्के अग्रीम देण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत खा.राजेनिंबाळकर यांनी धाराशिव, लातूर आणि सोलापूर च्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली.

Post a Comment

أحدث أقدم