क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी आदर्श ठरेल-संतोष सोमवंशी

क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी आदर्श ठरेल-संतोष सोमवंशी 

औसा : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान सोहळा  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीच्या वतीने माळकोंडजी (ता. औसा) येथे संपन्न झाला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ही अकॅडमी सुरू केल्या बद्दल व क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे नाव दिल्याबद्दल आ. सतीश चव्हाण याचे औसा तालुका च्या वतीने जाहीर आभार माणून ही अकॅडमी औसा तालुक्यातील नव युवकास दिशा दर्षक ठेरल असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले 
अध्यक्षस्थानी पिलॅटस एजन्सी डायरेक्ट तन्मय भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अर्जुन जाधव, प्रोजेक्ट प्रमुख तुषार पांडे, संत
मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, गणेश विद्यालय उजनीचे मुख्याध्यापक प्रवीण कोपरकर, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, माळकोंडजी माजी सरपंच संजय कुलकर्णी, माजी मेजर विजयकुमार पटवारी, लातूर जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर कृष्ण गिरी, क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी समन्वयक संतोष आनंदगावकर, जगदिश पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्राचे आभार तानाजी चव्हाण यांनी मानले यावेळी अकॅडमीचे विद्यार्थी व पालक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم