शारदा विद्यालयात विद्यार्थ्यांना योगाचे धडे


शारदा विद्यालयात विद्यार्थ्यांना योगाचे धडे




 लातूर-येथील शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना योगशिक्षिका रुपाली पाटील (मिरासदार) यांनी योगाचे धडे दिले.
रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी, शिक्षक एकनाथ जाधव, अनघा पाटील, मानसी पाटील, सुषमा मुंडे, अशा गुडदे, अश्‍विनी पवार, गोयल गोखले, माया ससाणे, वर्षा कांबळे, रेणुका समुद्रे, अर्चना देशमुख उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी जीवनात योगाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. प्रास्ताविक दर्शना देशमुख यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم