नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत महाशक्‍ती बनेल-माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत महाशक्‍ती बनेल
-माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर-भारतामध्ये इंग्रजकालीन शिक्षणपध्दतीमध्ये 37 वर्षानंतर डॉ.कस्तूरीरंजन यांच्या नेतृत्वाखालील कमिटीने जगातील शैक्षणिक बदलाचा अभ्यास करून अध्यात्म, विज्ञान व उद्योगावर आधारीत बदलाचा प्रस्ताव दिला त्यास मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने परवानगी देऊन सीबीसीएस शिक्षणपध्दती लागू केली. त्यामुळे भारतामधील तरूण देशाला महाशक्‍तीशाली बनवतील असे प्रतिपादन जी.एस.पी.एम. शिक्षण संस्था उदगीरच्यावतीने आयोजित गुरूवर्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.व  भाजपा किसान मोर्चा गोवा प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशीक उपायुक्‍त समाजकल्याण श्री.अविनाशजी देवसरवार होते. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे उपस्थित होते.

बौध्दिक संपदा हीच जगामध्ये सर्वश्रेष्ठ
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर साहेब म्हणाले की, 20 व्या शतकामध्ये अनेक नवीन शोध लागले 21 वे शतक हे पैसा सत्ता याचे नसून ज्याच्या डोक्यात बौध्दिक संपदा आहे. तेच जगावर राज्य करत आहेत. ब्रिटनने अडीच कोटीची लोकसंख्या असताना मागील काळात अमेरिका, भारतासहीत जगावर राज्य केले. आज बील गेट्स, स्टिव्ह जॉब, राममूर्ती बुध्दीच्या जोरावर जगात श्रीमंत आहेत.

भारताने शिक्षण व रिसर्चवरती आर्थिक निधी वाढवावा
जगामध्ये आज अमेरिकेचा जीडीपी 21 ट्रिलियनपेक्षा अधिक असताना शिक्षणावर 6.1 टक्के तरतूद, यु.के.6.2 टक्के, भारत जीडीपी 3.535 ट्रिलियनमध्ये शिक्षणावर 3.1 टक्के आहे. रिसर्चवरती अत्यंत कमी तरतूद आहे. ती तरतूद किमान 6 टक्के रिसर्चवर वाढ केली पाहिजे. राज्य सरकारनेही आर्थिक तरतूद वाढवण्याची गरज असल्याचे अभ्यासपूर्ण विविध विषयावरती प्रभावी विचार मांडण्याचे काम शिक्षण, कृषी, बँकींग विषयावरील अभ्यासक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडले.
यावेळी गुरूवर्य पुरस्काराने प्रत्येक तालुक्यातील एक आशा कार्यकर्ती व 10 प्राध्यापकांना गुरूवर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी दत्ताजी पवार, शिवानंद हैबतपूरे, पंडीतराव सुकनीकर, संजय पाटील, प्रा.डॉ.जयद्रथ जाधव रेणापूर, अमित राठोड उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم