तीन तपानंतरही आठवणीसह भूकंपग्रस्ताच्या दैनंदिन अडचणीत वाढ

तीन तपानंतरही आठवणीसह भूकंपग्रस्ताच्या दैनंदिन अडचणीत वाढ

नांदुर्गा प्रतिनिधी- औसा तालुक्यासह लोहारा व उमरगा तालुक्यातील ५२गावात गुरुवार ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे ४:४५ वाजता ६.३ रिश्टर स्केलच्या सुरू झालेल्या भयंकर भूकंपाच्या धक्क्यामध्ये हजारो लोक दगड मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली.३० ते ४० हजाराच्या वर लोक जखमी झाले. तर काहीना कायमचे अपंगत्व आले. हा प्रलय म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी एक अविस्मरणीय प्रसंग ठरला आहे.आता या काळ रात्रीला २९वर्षे पूर्ण झाली असून भूकंपाने दिलेल्या शरीरावरील जखमाचे व्रण बुजले खरे परंतु, त्यावेळेस डोळ्यादेखत घडलेल्या महाभयंकर आठवणी आजही मनात घर करून आहेत.

तसेच नागरी समस्यांमध्ये राहण्याच्या निवाऱ्यापासुन ते दैनंदीन गरजा मिळवण्यासाठी भुकंपग्रस्त नागरिकांना धावपळ करावी लागते.त्यात प्रामुख्याने २९ वर्षापुर्वी असलेली छोटी कुटुंबे आता मोठी झाली आहेत.भुकंपानंतर वाटप करण्यात आलेल्या घरामध्ये  कुटुंब मावेनासे झाले आहे.त्यामुळे राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे,किंबहुना कुटुंबे वाढत चालली आहेत मात्र गावाचे क्षेत्रफळ मात्र वाढत चालले नाही.त्यामुळे उपलब्ध जागेतच नागरिकांना राहावे लागते आहे.                                     तथापि २९ वर्षानंतरही भुकंपग्रस्त प्रमाणपत्रासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.त्यामुळे भुकंपग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगारी वाढत चालली आहे. भुकंपानंतर वसलेली गावे जुने गाव सोडुन त्याच परिसरात पक्के पुनर्वसन करुन वास्तव्य करित आहेत.तर नविन पुनर्वसीत गावे ही जवळ-जवळच कायमस्वरुपी वसली असल्याने गावांच्या सिमांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवाय पुनर्वसीत कांही गावे वगळता अनेक गावांतील पथदिवे,रस्ते,पाणी पुरवठा योजना सारख्यां योजनांचा पुरता बोजवारा उडाला असुन,अशा अनेक समस्या  उभ्या आहेत.त्याच बरोबर औसा तालुक्यातील बऱ्याच पुनर्वसीत गावातील घरांचे कबाले शासनाने वाटप केली नसल्याने तसेच मयत व्यक्तीच्या नातेवाईकानां व अनेक नागरिकांना घरकबाल्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.उपरोक्त बाबींकडे प्रशासनाने लक्ष पुरविने गरजेचे आहे हे अधोरेखीत सत्य आहे.

Post a Comment

أحدث أقدم