उटी ची आई तुळजाभवानीचे दुसरे रुप

उटी ची आई तुळजाभवानीचे दुसरे रुप            




                                       
औसा तालुका वैभवशाली म्हणून ओळखला जातो. औशाचा भुईकोट व नर किल्ला नाथसंस्थान पिठ जैन मंदिर जामा मंजीद राम मंदीर खरोसा लेणी व रेणुका मातेचे मंदिर ,देवताळा देवी मंदिर उजनी गणेशनाथ समाधी मंदिर , हसेगाव दत्त टेकडी आणि उटी बु.ची आई म्हणजे तुळजाभवानीचे दुसरे रुप होय ,उटी बु हे हैद्राबाद च्या निजाम राज्यातील एक छोटस कसबेगाव पण जहागीर ठिकाण येथील जानराव देशपांडे हे तुळजाभवानी चे उपासक एकनिष्ठ भक्त त्यांची देवीवर नितांत निष्ठा , श्रद्धा, भाव व विश्वास होता, देविचे सच्चे उपासाक असल्यामुळे उटी बु ते तुळजापूर 50 कि.मी. अंतर असुन ही नित्य नियमाने दररोज   पहाटे स्नान करुन नेवैद्य तयार करुन त्या काळी ते घोड्यावर जाऊन आई तुळजाभवानी मातेला नेवैद्य दाखवणे व परत येउन च अन्नग्रहन करत असायचे त्यांच्या अर्धागिणी ही मालक तुळजापूर वरुन देवीला नेवैद्य् दाखऊन आल्या शिवाय जेवन करत नसत असा त्यांचा नित्य नियम होउन गेला .बारा वर्षापर्यंत कधिच खंड पडू दिला नाही बारा वर्षाची ही खडतर तपश्चर्या पूर्ण होताच आई भवानी प्रसन्न होऊन श्री जानराव देशपांडे यांना साक्षात्कार दिला व आज पासुन दर्शनासाठी तुळजापूरला यायची गरज नाही मिच तुझ्या गावी येत आहे उटी गावीच माझी प्राणप्रतिष्ठापणा कर नियमित पुजा करजा जा मि प्रसन्न झालेली असुन तुला हे वरदान देते असा साक्षात्कार देविने दिला .तुळजापूर ला येऊन येऊन दर्शन घेतल्याचे जे पुण्य तेच पूण्य उटीतून घेतलेले दर्शन हे दोन्हीही पुण्य सारखीच शिवाय बारा वर्षाचे वृत सिद्धीस केल्या मुळे तुझ्या घराण्यात प्रतेक पिढीला एक कर्तबगार व्यक्ती जल्माला येईल असा वर ही दिला होता . उटी ची आई आपल्या दिनदुबल्या , गरीब , अन्याय शेतकरी ,कष्टकरी वरदायनी आहे .नवसाला पावणारी आई म्हणून जिल्ह्यात ख्याती असुन तिचे 5 खेटे करुनही आपले दुंःख विघ्ण हरण करणारी आई होय.अल्पशी सेवा केल्यास ही प्रसन्न होणारी आई पानिपतच्या तिसर्या युद्धात मरठ्यांना  विजय मिळावा म्हणून नानासाहेब पेशव्यांनी तुळजाभवानी मातेला नवस बोलला होता त्याच बरोबर उटीच्या आईला ही नवस केला होता.आणि आईचा लाडका भक्त जानराव देशपांडे यांची भक्तीपर ख्याती सर्वत्र पसरली होती जानराव देशपांडे यांची सर्वदुर झालेली ख्याती पाहुन हैद्राबाद चा दुसरा निझाम हा हत्तीवर बसुन देशपांडे यांच्या स्वागता साठी आला असता त्याने एक तबक भरुन मोहरा एक पेहराव व एक मुरबी घोडा नजराना म्हणून पेश केला निजाम राजा भेटीसाठी येत आहे असे समजताच आपण ही त्याच तोला मोलात समोर जाऊन स्वागत करण्यासाठी घोड्यावर बसुन निघाले देशपांडे व हत्तीवर बसुन आलेला निजाम यांची भेट झाली एक राजा तर दुसरा भक्त ? नजराना स्विकार करायचा कसा ? खाली कोण उतरणार ? तेव्हा जगदंबेचे निष्ठावंत भक्त देशपांडे यांनी आपला रुदबा आणि मान न खाली घलाता घोडा हत्ती समोर माघच्या दोन्ही पायावर उभाकरुनच निजामाचा नजराणा स्विकारला .                     आईची नित्यपुजा , व्यवस्था , नवैद्य, नंदादिप पुजा नगारा वाजवण्याचे काम झाडलोट निगराणी ईतर सर्व देखभाल व देशपांडे यांची निष्ठावंत भक्ती पाहुन स्वताह निजाम ही खुष झाला होता.                              आईच्या रोजच्या नित्य पुजा व आरती च्या वेळेस मुख्य वाद्य म्हणून नगारा वाजविला जातो खरतर नगारा हे रण वाद्य असुन ही प्रत्येक देविच्या मंदिरात ठेवला जातो तो दिवसातुन तिन वेळेस वाजविण्याची प्रथा आहे ,मात्र नगारा फाटल्या नंतर बिनडागी कातड्या पासुन तो तयार केला जातो मात्र पुन्हा नगारा उटी च्या आईला केलेला नाही निजाम राजवटीत इ.स.1919 ला मंदिरातील रितीरिवाजासाठी देऊल - ए- कवायत कायदा झाला नगार्याच्या परंपरेत कुठलाही बदल झालेला नाही या नंतर मात्र परंपरे प्रमाणे रितीरिवाजास अनुसवरुन नगारा ऐवजी सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस चौघडा वाजविला जातो .रितीरिवाजा प्रमाणे चालत आलेला नवरात्र महोत्सव व कोजागिरी पोर्णिमेला असलेली भव्य दिव्य यात्रा या उटी गावात अठरापगड जातीजमाती असुनही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.हिंदू मुस्लीम ऐक घडवणारी उटी ची आई जगदंबा होय .आजही नवरात्र उपवास करणारी मुस्लिम बांधव उटी या गावामध्ये दिसुन येतात व हिंदू बांधाव किमाण एक दोन दिवसाचा रोजा करतात .वर्षभरात महिण्याच्या प्रत्येक पोर्णिमेला देविचा छबिना निगतो त्या,साठी सेवेकरी हरीभाऊ गोरे, भैरवनाथ गोरे , विठ्ठल गोरे , मयुर गोरे , दिनकर गोरे कालिदास गोरे भागवत धरमाळे शिवाजी भोकरे , तसेच देवी मंदिराचे पुजारी म्हणून एकनाथ जानकर हे आहेत व वंशपरपरे प्रमाणे चौघडा वाजवण्याचे काम शिवमुर्ती कांबळे हे करतात तसेच अंबीर जमादार हे देवी साठी सांजवातीला तेल गोळा करण्याचे काम करतात .अशा प्रमाणे उटी च्या जगदंबा देवीची अख्याईका पंचकृषीत व जिल्ह्यात पसरलेली आहे .


         रामकृष्ण जाधव उटी बु ता.औसा

Post a Comment

أحدث أقدم