सरकारने शेतक-यांना दिलेला शब्‍द पाळला-आ.संभाजी पाटील निलंगेकर

सरकारने शेतक-यांना दिलेला शब्‍द पाळला-आ.संभाजी पाटील निलंगेकर



 

लातूर प्रतिनिधी :-शेतकरी हिताला बांधील असलेल्‍या शिंदे फडणवीस सरकारने राज्‍यातील एकही शेतकरी नुकसान भरपाईच्‍या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही दिलेली होती. सरकारने शेतक-यांना दिलेला शब्‍द पाळलेला असुन लातूर जिल्‍हयासह राज्‍यातील शेतक-यांना सततच्‍या पावसाने झालेल्‍या नुकसान भरपाई पोटी मदत जाहीर केलेली आहे. यामध्‍ये लातूर जिल्‍हयातील ३ लाख ४२ हजार शेतक-यांना २९० कोटी रूपयांची मदत जाहीर असल्‍याच माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्‍ह द्वारे संवाद साधत असताना दिली आहे. या मदतीबददल मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषाच्‍या पलीकडे जाऊन मदत दिल्‍याबदल त्‍यांचे आभार व्‍यक्‍त केले आहेत.

      यावर्षी खरीप हंगामात शेतक-यांना अतिवृष्‍टी, गोगलगाय व इतर कीडरोग प्रादुर्भाव यासह सततच्‍या पावसाच्‍या संकटाला सामोरे जावे लागले होते. यामुळे शेतक-यांच्‍या हातातून खरीप हंगामातील पिके जाऊन ते आर्थिक अडचणीत सापडलेले होते. शेतक-यांना या परिस्थितीत पुन्‍हा उभा करण्‍यासाठी राज्‍य सरकारकडुन मदतीचा हात अपेक्षित होता. शेतक-यांच्‍या हितासाठी आणि त्‍यांच्‍या मदतीसाठी बांधील असलेल्‍या शिंदे फडणवीस सरकारने याबाबत तात्‍काळ व निकषाच्‍या पलीकडे जाऊन मदतीचा निर्णय घेतला असल्‍याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. लातूर जिल्‍हयातील ९२ हजार ६५२ शेतक-यांना पहिल्‍या टप्‍यात गोगलगाय व इतर कीडरोग प्रादुर्भावामुळे झालेल्‍या नुकसान भरपाई पोटी ९३ कोटी रूपयांची मदत जाहीर करण्‍यात आली. ज्‍या शेतक-याना सतत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्‍या शेतक-यांना अतिवृष्‍टीमुळे नुकसान भरपाई झालेल्‍या मदतीमध्‍ये सामावून घेण्‍याचा निर्णय घेतलेला होता. त्‍याअनुषंगाने जिल्‍हयातील ३९ हजार ८८२ शेतक-यांना २७ कोटी १९ लाख रूपयांची मदत जाहीर झालेली होती. मात्र सततच्‍या पावसाने सुध्‍दा शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्‍याचे सरकारला निदर्शनास आणुन दिलेले होते. या शेतक-यांनाही सरकारच्‍या वतीने मदत मिळणे गरजेचे असल्‍याचे सांगून त्‍यासाठी पाठपुरावा करण्‍यात आलेला होता असे आ.निलंगेकर यांनी सांगितले. या पाठपुराव्‍यामुळे शेतक-यांना कोणत्‍याही परिस्थितीत मदत जाहीर करण्‍यात येईल आणि नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

मात्र ज्‍या विरोधकांनी आपल्‍या सत्‍ता काळात शेतक-यांच्‍या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून त्‍यांच्‍याकडे पाठ फिरवली होती त्‍या विरोधकांनी शेतक-यांना मदतीपासून वंचित ठेवल्‍याचा आरोप करत राजकीय स्‍वार्थासाठी आंदोलने केली असल्‍याचे आ.निलंगेकर यांनी निदर्शनास देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही देत राज्‍यातील प्रत्‍येकाला आपलेसे वाटणा-या सरकारकडुन शब्‍द पाळला जाईल असे शेतक-यांना सांगितले होते. त्‍यानुसार राज्‍यातील शेतकरी हितासाठी बांधील असलेल्‍या शिंदे फडणवीस सरकारने नुकसान भरपाईचा तिसरा टप्‍पा जाहीर केला आहे. या टप्‍यात सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या जिल्‍हयातील बहुतांश सर्वच म्‍हणजे ३ लाख ४२ हजार ७१ शेतक-यांना एकुण २९० कोटी रूपयांची मदत जाहीर केलेली आहे. या मदतीत जिल्‍हयातील सर्वच तालुक्‍यातील महसूल मंडळाचा समावेश करण्‍यात आला असल्‍याचे माहिती आ.निलंगेकर यांनी दिली आहे. एकुन तीन टप्‍यात जिल्‍हयातील ४ लाख ७४ हजार ६०५ शेतक-यांना ४११ कोटी रूपयांची मदत जाहीर झालेली आहे. या मदतीसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषाच्‍या पलीकडे जाऊन निर्णय घेतल्‍याबददल त्‍यांचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्‍यक्‍त केले आहेत.आगामी काळातही शेतक-यांच्‍या हितासाठी हे सरकार बांधील असेल अशी ग्‍वाही देवून शेतक-यांनी विरोधकांच्‍या भुलथापाला बळी पडु नये असे आवाहन आ.निलंगेकर यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم