गुंफावाडी परिसरातील व्यसनमुक्तीसाठीमहिलांचे रस्ता रोको आंदोलन

गुंफावाडी परिसरातील व्यसनमुक्तीसाठी
महिलांचे रस्ता रोको आंदोलन




लातूर प्रतिनिधी-जिल्ह्यातील गुंफावाडी व‌ मुरुड रेल्वे स्टेशन परिसरात होणारी अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी,महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून  महिलांनी  रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व नीता मगर या सामाजिक कार्यकर्त्या यांनी केले.
तर दोन तास चाललेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने माजी सरपंचासह, शिवाजी पवार माहिती अधिकार राज्य प्रशिक्षक , जिल्ह्या महिला उपाध्यक्ष लता भोसले, माजी केंद्रप्रमुख कमलाकर सावंत,अंगद जाधव सरपंच निवळी,बालाजी गाडे ग्रामस्थ ,तावरजखेडा सरपंच ,गुंफवाडी गावचे रोजगार सेवक पमु गाडे व पाटील खंडापुरकर  भ्रष्टचार निर्मूलन समिती ,यांनी अवैध दारू विक्री मुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची माहिती देत कायम दारू बंदी करण्यासाठी निर्णय घेतल्याचे सांगितले.तर इतर वक्त्यांनी अवैध दारू विक्रीमुळे झालेल्या जीवीत व वित्त हानीची माहिती देत,ती थांबविण्यासाठी प्रशासनाला विनंती केली.शेवटी दीपशिखा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नीता मगर यांनी आंदोलनात सहभागी उपस्थितांचे आभार मानले.
आंदोलनात महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावली होती.
पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवुन,संपूर्ण आंदोलन व्यवस्थित पार पडावे यासाठी प्रयत्न केले.  तर या पुढेही गावातील  सर्व दारू बंद करावी म्हणून  पुन्हा एक पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم