शारदा सेमी स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा दांडिया


शारदा सेमी स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा दांडिया




लातूर-येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात स्कूलच्या संचालिका शारदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरयू पाटील, सुषमा पुरी, रेखा मोरे, मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सरस्वती स्त्रोताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केली. यावेळी विज्ञान प्रदर्शनासह व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शारदा पाटील व शरखू पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शना देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सुषमा मुंडे यांनी केले. आभार प्रदर्शन माधुरी पाटील यांनी केले.
यावेळी एकनाथ जाधव, अनघा पाटील, मानसी पाटील, उषा गुडदे, माया ससाणे, सूरज गड्डिमे, अश्‍विनी पवार, रेणुका समुद्रे, शीतल नडगिरे, प्रांजली पाटील, ऐश्‍वर्या बागल, वर्षा कांबळे, गीतांजली स्वामी, कांचन देवधर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم