भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स विद्यार्थी आघाडीच्या शाखेचे अनावरण

 भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स विद्यार्थी आघाडीच्या शाखेचे  अनावरण

लातूर -भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगेे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने शहरामध्ये शाखा स्थापनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. शहरातील कॉक्सीट कॉलेज अंबाजोगाई रोड येथे भारतीय जनता युवा मोर्चा शहर जिल्ह्याअंतर्गत येणार्‍या युवा वॉरियर्स विद्यार्थी आघाडीच्या 39 व्या शाखेच्या फलकाचे अनावरण कॉक्सीट कॉलेज अंबाजोगाई रोड येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव व भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, राहूल भूतडा,  लक्ष्मण मोरे, विद्यार्थी आघाडीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश पवार, नवनियुक्‍त विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष शुभम माळवदे, आदित्य माने, विद्यार्थी आघाडी चिटणीस पवन झेटे, भाजपा युवा मोर्चा पुण्यश्‍लोक आदिल्यादेवी होळकर मंडळाध्यक्ष काका चौगुले, श्री.सिध्देश्‍वर मंडळाध्यक्ष रवीशंकर लवटे, मंदार कुलकर्णी, संतोष तिवारी, चैतन्य फिस्के, यशवंत कदम, अजय रेड्डी, महादेव पिटले, ईश्‍वर सातपुते, ईश्‍वर कांबळे, ऋषिकेश क्षिरसागर, तन्मय पवार, अभिषेक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स शाखेच्या अध्यक्षपदी तुषार बदनाळे, उपाध्यक्ष अमर पाटील, मंगेश लादे, सरचिटणीस कृष्णा चव्हाण, अजय पारीख, चिटणीस किरण पाटील, शिवशंकर माळी, सोशल मिडीया प्रमुख श्रीकांत बेदकुंदे, रोहन कदम यांची निवड करण्यात आलेली आहे तर सदस्यामध्ये सुरज गोसावी, अथर्व देशमुख, निखील दर्शने, महेश मलशेट्टे, विशाल घार, मयुर दराडे, ओमकार गुमटे, विष्णू जाधव, पंकज जाधव, पार्थ पाटील, वैभव पाटील, विशाल माने, कृष्णा आगवाने, अमर पवार, सूदर्शन मलेशे, कृष्णा काकडे, यश देशमुख, रवी लामतूरे, शुभम स्वामी, पार्थ जोशी, निखील शेळके, प्रताप पवार, शाम फावडे, आकाश चट, सूदर्शन सुरनार आदींचा समावेश आहे. नुतन पदाधिकार्‍यांच्या या निवडीबद्दल लातूर शहर व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
लातूर शहर मतदार संघातील कानाकोपर्‍यात युवा वॉरीयर्सच्या शाखा उघडणार
भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून तरूणाचे संघटन वाढविण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भाजपा युवा मोर्चा, विविध मंडळे, युवा वॉरियर्स, विद्यार्थी आघाडी आदींच्या माध्यमातून तरूणांचे संघटन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. लातूर शहर मतदार संघात प्रत्येक विभाग प्रभागामध्ये शाखेचे स्थापना करून संघटन वाढविले जात आहे. यापुढील काळातही लातूर शहर मतदार संघातील कानाकोपर्‍यात युवा वॉरीयर्सच्या शाखा उघडणार आणि या माध्यमातून तरूणांचे ऐतिहासिक संघटन वाढविणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم