जिपशा सारोळा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

जिपशा सारोळा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
औसा प्रतिनिधी- तालुक्यातील जि.प.प्रा.शा.सारोळा ता.औसा शाळेत  मिसाईलमॅन डाॅ.ए पी जे अब्दूल कलाम यांच्या  जयंती निमित्त सर्व शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत शा.व्य.स.अध्यक्ष शेख लतिफ दस्तगीर यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. यावेळी  शिंदे एम.डी,  क्षीरसागर सर व दंडीमे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलामांच्या जीवनाविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांनीही यावेळी प्रयोगाचे सादरीकरण तसेच भाषणे करून जयंती साजरी केली.तसेच जागतिक हात धुवा दिनानिमीत्त हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यावेळी  लालासाहेब साळुंके,ग्रामसेवक शहापुरे , तसेच  स्वच्छ भारत मिशनचे सुशीलकुमार गरगडे,  शिवराज राऊत व भागवत टेकाळे हे समूह समन्वयक सुद्धा उपस्थित होते.त्यांनी  मुलांकडून हात कसे धुवावेत याचे  प्रात्यक्षिक करून घेतले. यासोबतच वाचन प्रेरणा दिन असल्यामुळे व्हरांड्यामध्ये पुस्तके एका दोरीला बांधून लटकावली गेली व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन जवळपास दोन तास वाचन केली व मैदानात बसून चित्रे सुद्धा काढली. या उपक्रमासाठी  प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या धाईंजे सरांचा पुढाकार होता.
 तसेच आज जि.प.प्रा.शा. सारोळा शाळेत महिला मेळावा* आयोजित करण्यात आला होता.त्यानिमित्त गावातील अनेक महिला शाळेत उपस्थित होत्या. या मेळाव्यात शाळेतील शिंदे सर,दंडिमे मॅडम,तोळमारे सर तसेच प्रगत शिक्षण संस्था फलटणचे श्री धाईंजे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले व रायनुळे मॅडम,माळी सर यांनी 1ली,2री,3री च्या वर्गातील महिला लिडर व महिला गटाची माहिती पूर्ण केली.या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व मु.अ.बिराजदार सर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर दळवे सर यांनी आभार व्यक्त केले.
शेवटी सर्व महिला समक्ष 5वी,6वी,7वी च्या मुलींकडून विज्ञानाची परी, ओ देश मेरे व एका इंग्रजी कवितेवर समूहनृत्य सादर करण्यात आले.एकंदरीतच आजच्या दिवशी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानीच ठरली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचा एकाच दिवशी खूप छान मिलाप साधलापक्रमांचा मळा, उपक्रमशील शाळा म्हणजेच जिल्हा परिषद सारोळा ता.औसा या शाळेची ओळख आहे.यावेळी गावातील ग्रामस्थ,शाळेतील सर्व शिक्षकवृंद,आदी.उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم