शेळगी येथे संतोष सोमवंशी यांचा सत्कार

शेळगी येथे संतोष सोमवंशी यांचा सत्कार 



निलंगा तालुक्यातील शेळगी येथे महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळगी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र जाधव होते. तर सत्कारमूर्ती मा. संतोष सोमवंशी व प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मोहन माकणे, डी .बी. गुंडुरेसर, शेळगीचे सरपंच बंकट बिरादार, पोलीस पाटील अनिल पाटील,  डॉ. संतोष भोसले, संतोष दगडे पाटील, बिबिषन गरड, मनोज सोमवंशी, गोविंद जाधव, मनोज डिग्रसे, लक्ष्मण दाताळ, प्रा.अंकुश सूर्यवंशी, बाबुराव सूर्यवंशी, चेअरमन प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. उमाकांत जाधव यांनी मांडले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आदर्श शिक्षक लोकमत आयकॉन ठरलेले मोहन माकणे यांनी मराठा नेतृत्वाचे बदलते आकृतीबंध या पुस्तकावर प्रकाश टाकत असताना सर्वसामान्य कुटुंबातून उदयाला येणारे नेतृत्व म्हणजे संतोष सोमवंशी हे उदाहरण असून धानोरा सरपंच, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, औसा खरेदी विक्री संघ सभापती, शिवसेना जिल्हाप्रमुख ते महाराष्ट्राचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशा चढता आलेखात केलेले कार्य मराठा नेतृत्वाला आकृती घालून देणारे आहे, असे मत व्यक्त केले. संतोष सोमवंशी यांचा आलेख नेहमी चढता राहिलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करताना औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या काळात हे नेतृत्व उदयाला यावे, अशी इच्छा डॉ. उमाकांत जाधव यांनी व्यक्त केली. शेळगी गावांमध्ये जन्म घेतलेल्या प्रा. सूर्यभान जाधव यांचे औसा विधानसभा मतदारसंघासाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही.  शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून सतत पक्ष कार्यात असेन आणि औसा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी प्रयत्नशील राहील,तसेच शेळगी गावातील सत्काराने मला एक नवी ऊर्जा मिळाली असे सत्कारमूर्ती संतोष सोमवंशी यांनी मत मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  डॉ. उमाकांत जाधव, माजी सरपंच प्रकाश बिरादार, गणेश बिरादार, अंबादास बिरादार, दत्ता बिरादार, व्यंकट माळी, महेश बिरादार, लक्ष्मण रोडे, ओमप्रकाश माकणे, श्रीहरी माकणे, आदीने परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم