'हर घर नर्सरी' उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

'हर घर नर्सरी' उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

 

औरंगाबाद- वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी 'हर घर नर्सरी ' उपक्रम राबविण्यात येत असुन या अंतर्गत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपे तयार करावयाची आहेत. लोकसहभाग वाढावा हा उपक्रमाचा हेतू असुन वृक्ष लागवड अभियानाला व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकणार आहे.

उपक्रमामध्ये शासनाच्या सर्वच यंत्रणांचा सहभाग आवश्यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपे तयार केल्यास 2023 च्या पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपांची स्थानिक पातळीवर उपलब्धता होईल. यासाठी लोकजागृती आवश्यक आहे.  सर्व नागरिकांनी, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना 'हर घर नर्सरी ' उपक्रम प्रभावीपणे राबवून यशस्वी करण्याचे आवाहन उप आयुक्त (रोहयो) औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم