कायदेविषयक जनजागृती शिबिरातून समाज प्रबोधन

कायदेविषयक जनजागृती शिबिरातून समाज प्रबोधन

लातूर- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापूर येथे नागरिकांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत कायदेविषयक शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर होत्या.
गटविकास अधिकारी तुकाराम भालके, अॅड. सुमेधा शिंदे, अॅड. अंजली जोशी, अॅड. छाया अकाते अॅड. सिध्दिका कोसमकर यावेळी उपस्थित होते.
             याप्रसंगी अॅड. जोशी यांनी मूलभूत कर्तव्य व हक्क या विषयावर र्गदर्शन केले. अॅड. शिंदे यांनी महिलांचे कायदे व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार याविषयी, तर अॅड. छाया अकाते यांनी बालकांचे संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. कोसमकर यांनी लोकन्यायालयाबाबत माहिती दिली.
श्रीमती अवसेकर यांनी महिलांचे अधिकार व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, हुंडाप्रथा सारख्या चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी कायद्यांची माहिती जाणून घ्यावी. कोणतेही छळ व अत्याचार सहन करून नयेत, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ता तालुका विधी सेवा समितीमार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना व महिलांना मोफत विधी सहाय्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री. भालके यांनी केले,  तलाठी  श्री. सूर्यवंशी यांनी आभार मानले. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
                    
                                                                    

Post a Comment

أحدث أقدم