अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही
· 23 लाख 10 हजार रुपयांच्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त.
· 84 हजार 605 रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारी जप्त.
उस्मानाबाद- जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाची जप्तीची कार्यवाही घेण्याबाबत पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांना सूचित केले होते. त्याअनुषंगे पोलीस प्रशासनाने दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी प्रतिबंधित अन्न पदार्थ वाहतूक करणारे वाहन क्र. एमएच 13 एक्स 3716 पकडून अन्न व औषध प्रशासन कार्यालय उस्मानाबाद यांना दि.01 नोव्हेंबर 2022 रोजी कळविले, त्याअनुषंगे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती.न.त.मुजावर यांनी उमरगा पोलीस स्टेशन येथे जावून अजीम करीमसाब शेख यांच्याकडून 23 लाख 10 हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आणि वाहतूक करणारे वाहनाची किंमत 05 लाख रुपये जप्ती करून उमरगा पोलीस स्टेशन येथे संबंधिता विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालातून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेतलेला आहे आणि उर्वरित साठा आणि वाहन जप्त करून पुढील आदेशांपर्यंत पोलीस स्टेशन उमरगा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
तसेच दि.02 नोव्हेंबर 2022 रोजी उस्मानाबाद येथील अन्न व औषध प्रशासन या कार्यालयास प्राप्त माहितीच्या अनुषंगे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती.न.त.मुजावर यांनी उस्मानाबाद अमृत नगर येथील दिलदार अबरार पठाण यांच्या घरी जावून तपासणी केली. तेंव्हा त्या ठिकाणी विविध ब्रांडचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी ज्याची एकूण किंमत 84 हजार 605 रुपये विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. या जप्त मुद्देमालातून 19 प्रतिबंधित अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत आणि उर्वरित साठा जप्त करून पुढील आदेशांपर्यंत कार्यालयात जमा केला आहे. तसेच साठामालक आणि हजरव्यक्ती दिलदार अबरार पठाण यांच्या विरुद्ध आंनद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही सहाय्यक आयुक्त (अन्न) शि.बा.कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी न.त.मुजावर, स्व.सु.कुलकर्णी, वि.वि.तवरे, यांनी औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त उ.शं.वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा, वितरण, विक्री करु नये, तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यापुढेही अशा प्रकारच्या कार्यवाही सुरु राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांनी केले आहे.
إرسال تعليق