समर्पित व सेवाभाव वृत्तीने काम केल्यास लातूर जिल्ह्याची चौफेर प्रगती होईल - माजी आ.पाटील कव्हेकर

   समर्पित व सेवाभाव वृत्तीने काम केल्यास लातूर जिल्ह्याची चौफेर प्रगती होईल- माजी आ. पाटील कव्हेकर





लातूर -स्मार्ट व्हिलेजच्या माध्यमातून कव्हा गावचा चौफेर विकास झालेला आहे. औरंगाबाद जवळील पाटोदा व अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाची पाहणी करून त्याच धर्तीवर कव्हा गावचा विकास करण्याचे काम सुरू केलेले आहे. कव्ह्याच्या विकासासाठी सात कोटी रूपये खर्च करून सुसज्ज असे प्राथमिक उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे. चार कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून घरोघरी नळ योजनतेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने समर्पित भाव व सेवावृत्तीने काम केल्यास लातूर जिल्ह्याचा चौफेर विकास होईल आणि कव्हा गावचे नाव तालुका, जिल्हातच नाही तर राज्यात प्रथम येईल. असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शुध्द पेजयल मशीनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, सरपंच पद्मीनताई सोदले, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक कसबे, सूर्यकांत होळकर, नेताजी मस्के, ग्रामपंचायत सदस्य काका घोडके, रसूल पठाण, गोपाळ सारगे, सदाशीव सारगे, पंडीत खंडागळे, शिवशरण थंबा, नामदेव मोमले, लक्ष्मण सूर्यवंशी, विश्‍वंभर घार,  शिवाजी घार, विश्‍वास पाटील, नागेश चवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, कव्हा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम महाराष्ट्रामध्ये अत्यंत आकर्षक व सुविधायुक्‍त झाले आहे. 23 एकरवर सुरू असलेले   विभागीय स्टेडीयमचे काम राजकीय भावनेतून बंद केले होते ते चालू करण्याचा आदेश मा.हायकोर्ट औरंगाबादने दिला. त्यामुळे ते काम चालू होत आहे. कव्हा गावच्या तीन ठिकाणी वस्त्या आहेत. त्या ठिकाणी अद्ययावत पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ती राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले.
यावेळी डॉ.किरण कर्‍हाळे, स्वामी,  ग्रामसेवक सचिन कसबे, चाफे कानडे यांच्यासह कव्हा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तरच आदर्श गावचे स्वप्न साकार होईल
स्मार्ट व्हिलेज कव्हा गावच्या विकासासाठी पहिल्यांदा दारूमुक्‍ती आणि तंटामुक्‍तीचा निर्णय घेतला. तरूणांना गावातच रोजगार मिळावा यासाठी अनेक उद्योगाची उभारणी केली. केलेल्या कामामुळे कव्हा हे गाव आदर्श ग्राम म्हणून लातूर तालुक्यात प्रथम आलेले आहे. परंतु स्मार्ट व्हिलेजसाठी दिलेल्या गुणदानानुसार गावचा विकास केल्यास कव्हा गाव जिल्हा, मराठवाड्यातच नाही तर राज्यात पुढे येईल आणि कव्हा आदर्श गावचे स्वप्न साकार होईल. असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला

Post a Comment

أحدث أقدم