नांदुर्गा जि.प.शाळा,अंगणवाड्याना शालेय साहित्याचे वाटप

नांदुर्गा जि.प.शाळा,अंगणवाड्याना शालेय साहित्याचे वाटप








औसा -तालुक्यातील नांदुर्गा येथे  पंधरावा वित्त आयोगातून दिल्या जाणाऱ्या निधीतून चार अंगणवाडी व तसेच दोन जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यामध्ये कपाट,कुकर,पातेले,बकेट,टेबल,खुर्ची,घड्याळ,पाण्याची टाकी,कचराकुंडी, मार्कर फळा,लहान मुलांच्या खेळण्यासाठी घसरगुंडी,हलणारा घोडा, आदी साहित्य नांदुर्गा ग्रामपंचायत च्या माध्यमातून वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना अंगणवाडी कार्यकर्ती वणीताबाई कुलकर्णी,व मदतनीस शालुबाई कुंभार यांनी सांगितले की, नांदुर्गा गावाला तरुण तडफदार नेतृत्व असलेल्या सरपंच अश्विनी ज्योतीराम घाडगे यांच्या प्रयत्नातून गावच्या विकासात भर पडत आहे असे सांगत आपले मत व्यक्त केले.








 नांदुर्गा ग्रामपंचायतचे आभार मानले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष,धाडस संघटना अध्यक्ष आनिल कोळी,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم