लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बुमरेला यांना पेटंट प्रदान


लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बुमरेला यांना पेटंट प्रदान 

        
औसा प्रतिनिधी -भारत सरकार पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट प्रदान केल्याबद्दल लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांचा सत्कार श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे हे होते या पेटंट चा विषय "थीन लेअर क्रोम्याटोग्राफी चेंबर" या उपकरणासाठी हे डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले. हे तंत्रज्ञान वापरून वनस्पती मधील रसायनाचे पृथकरण प्रयोगशाळेमध्ये करणे शक्य होते "थीन लेअर क्रोम्याटोग्राफी चेंबर" प्लेट्स वरती पृथकरण झालेल्या रसायनांना पाहण्या सदृश्य बनविण्यासाठी त्याचे विशिष्ट रसायने वापरून प्रक्रिया करण्यात येते. या दोन्हीही प्रक्रिया करण्यासाठी दोन वेगवेगळे काचेचे उपकरणे लागतात,पण हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे रासायनिक प्रयोग करण्यासाठी हे एकच काचेचे उपकरण वापरल्याने कमी खर्चात व कमी वेळेत हे तंत्रज्ञान संशोधकांना वापरता येईल असे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी सांगितले, याप्रसंगी संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ. श्यामलीला जेवळे ( बावगे) व संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم