जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नारी प्रबोधन मंच यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नारी प्रबोधन मंच यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती







लातूर प्रतिनिधी -टाकळी  व  बामणी ता.जि.लातूर या गावात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नारी प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण कार्यक्रम घेण्यात आले. नारी प्रबोधन मंच चे अध्यक्ष सुमतीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मिळालेले कायदेविषयक माहितीचे पत्रक गावात ग्रहभेट घेऊन देण्यात आले.वरीष्ठ नागरिकांचे अधिकार, काटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार, लोकन्यायालय, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, वैकल्पिक वाद निवारण पद्धती,कायद्याबद्दल माहिती सांगण्यात आली.टाकळी या गावात, नारी प्रबोधन मंच चे कार्यकर्ते, अनिता उफाडे, विकास पवार,अंगणवाडी शिक्षिका हमिजा शिकलकर मॅडम, शरीफा शेख, निलोफर शेख, अनिता क्षीरसागर , शिवकांता बैकरे, गंगासागर घाडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते व बामणी या गावात नारी प्रबोधन मंच चे कार्यकर्ते सरोजा कांबळे, कचरू कांबळे, विकास पवार, जयश्री ठाकरे, सविता कांबळे, मीरा ढवळे, युवक,युती,बालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم