पालकाच्या फोनची दखल घेत आ. पवारांनी शाळेच्या मार्गाच्या कामास दिली तात्काळ मंजूरी..

पालकाच्या फोनची दखल घेत आ. पवारांनी शाळेच्या मार्गाच्या कामास दिली तात्काळ मंजूरी



 


(एस. ए. काझी )औसा /प्रतिनिधी : - तालुक्यात विविध विकास कामांचा धडाका लावत आमदार अभिमन्यू पवारांनी विकास कामांचा ओघ सुरूच ठेवला आहे.स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत शहर व परिसरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील समस्या सिमेंट रस्ता करणे, रस्ते डांबरीकरण करणे, नळकांडी पुल बांधणी, स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणी, रस्ता व नाली बांधकाम करणे, पाईपलाईन करणे समाजमंदिर सभागृह बांधणे, विकास कामांअंतर्गत रस्ते, सभामंडप मंजूर करण्यात आले असून आमदारांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव ओसरल्या नंतर आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्यक्ष कामांना सुरवात झाली औसा विधानसभा मतदारसंघातील तांडे, वाडी  येथील अंतर्गत रस्ते, सभामंडप आदी कामे प्रस्तावित केली होती. आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकास कामाचा ओघ सुरू असून  तालुक्यासह शहर विकास कामाचा पाठपुरावा, नागरिकांच्या समस्या आमदार जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविले जात आहे. शहरातील नामांकित चक्रधर प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच स्पर्श इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी व जाण्यासाठी पावसाळ्यात प्रचंड कसरत करावी लागत होती व याचा त्रास होत होता, या रस्त्याच्या विषयी औशाचे लोकप्रिय आमदार विकासपुरुष अभिमन्यू पवार यांना एका पालकाने विषय सांगून काही फोटो दाखवले असता आमदार अभिमन्यू पवारांनी तात्काळ या विषयी दखल घेत शाळेसाठी रस्ता मंजूर करून विद्यार्थी, पालक तसेच या भागातील नागरिकांना होणारा त्रास व समस्या सोडवली. शहरातील सारोळा रोड येथील चक्रधर शाळेच्या  परिसरातील नागरिकांतर्फे तसेच विद्यार्थी व पालकांतर्फे आमदार अभिमन्यू पवारांचे शतशः आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم