मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची पुनर्स्थापना करावी- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची पुनर्स्थापना करावी
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर -मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नर्सिंगराव यांच्याकडून वैधानिक विकास मंडळाची स्थापना करून घेतली होती. ते मराठवाडा, विदर्भ व उर्वरित मंडळाची मुदत संपून 04 वर्ष झाले पंरतु अद्यापही वैधानिक मंडळाच्या पुनर्स्थापनेसाठी मा.राष्ट्रपती यांच्याकडे कोणीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वैधानिक विकास मंडळाची पुनर्स्थापना करण्याची घोषणा केली. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती महोदयाकडे पाठवून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची पुनर्स्थापना करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्यपाल भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्स्थापना प्रस्तावाच्या मागणीस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्स्थापनेच्या प्रस्तावास गती मिळेल. अशी अपेक्षाही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.

Post a Comment

أحدث أقدم