बाल कल्याण समितीने साजरा केला बालगृहात "दीपोत्सव


बाल कल्याण समितीने साजरा केला बालगृहात "दीपोत्सव"

लातूर.-येथील लातूर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी आपल्या कुटुंबियांसह  एमआयडीसी येथील गोकुळ बाल सदन व मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह, लातूर येथील बालगृहात दिवाळी साजरी केली.
या प्रसंगी बालगृहातील बालिकांना वाचनाचे महत्त्व सांगून *पुस्तक हेच आपले खरे मित्र* आहेत यासाठी प्रत्येकानी वाचनाचा छंद जोपासावा, आपल्या शैक्षणिक अभ्यासा सोबत इतर अवांतर वाचन करावे  यासाठी समितीच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने "बालगृह तिथे ग्रंथालय" हा उपक्रम येत्या वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यासाठी बालगृहात समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी पुढाकार घेऊन वरील दोन्ही बालगृहाना प्रत्येकी 25 पुस्तकांचा संच देवून  छोटीशी सुरुवात आज करून दिली.
या प्रसंगी बालगृहातील बालिकांसोबत दिपोस्तव साजरा करण्यात आला.
फटाके मुक्त दीपावली साजरी करण्यासाठी बालकांना आवाहन करण्यात आले. 
फटाके निर्मिती साठी बालकांचा वापर करण्यात येतो. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे जी कृती समाजाचे नुकसान करते ती आपण टाळली पाहिजे असे मार्गदर्शन समितीच्या वतीने करण्यात आले.
"या पुढे आम्ही फटाके मुक्त दीपावली साजरी करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करू",असे आश्वासन बालगृहातील बालिकांनी बाल कल्याण समिती सदस्यांना दिले.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष-  राधाकृष्ण देशमुख,सदस्य-  ॲड.महादेव झुंजे,श्री.प्रणिल नागुरे, श्रीमती संगीता महालिंगे, समिती अध्यक्ष व सदस्य यांचे कुटुंबीय, मुलींचे बालगृहाचे संचालक श्री.मलवाडे सर, गोकुळ बाल सदनचे कर्मचारी अपर्णा बागले,श्री.दीक्षित सर दोन्ही बाल गृहातील इतर कर्मचारी हजर होते. बालिकांनी या प्रसंगी दीप प्रज्वलित करून दीपावली अतिशय उत्साहाने साजरी केली. "बालगृह तिथे ग्रंथालय" या उपक्रमाला नागरिकांनी  चरित्रात्मक,सामाजिक,वैज्ञानिक, पर्यटन अश्या विविध विषयावरची  पुस्तके, मासीके, बाल कल्याण समिती, लेबर कॉलनी, लातूर येथील समिती कार्यालयात जमा करून बालगृहातील बालकांना    सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم