लातूर जिल्हा क्रेडाईच्यावतीने पालकमंत्री गिरीष महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन
लातूर ( प्रतिनिधी) लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन यांना क्रेडाईच्यावतीने लातूर ते मुंबई उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा नियमीत करावी तसेच लातूर ते पुणे इंटरसिटी ही रेल्वे तात्काळ सुरू करावी तसेच लातूर हे शैक्षणिक हब असल्यामुळे उच्चशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असल्याने लातूरला कनेक्टीव्हीटी मिळविण्यासाठी या दोन्ही योजना मंजुर कराव्यात अशी विनंती करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे आ.रमेशअप्पा कराड, जिल्हा क्रेडाईचे अध्यक्ष सुबोध बेळंबे, के्रडाईचे भावी अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, माजी अध्यक्ष दिपक कोटलवार, महेश नावंदर, रमेश हत्ते, नागनाथ गित्ते, विष्णु मदने, धर्मवीर भारती आदि पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
إرسال تعليق